मा.उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर येथे दाखल रिट याचिका क्र ५९४३/२०२६ च्या अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत paripatrak gr

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मा.उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर येथे दाखल रिट याचिका क्र ५९४३/२०२६ च्या अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत paripatrak gr

संदर्भः-१. शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-२०२६/प्र.क्र.२४४/टीएनटी- १/दि.२९/७/२०२६

२. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे पत्र क्र प्राशिसं/ड-३०१/शिक्षक संवर्ग पदोन्नती/२०२६/दि.१४/५/२०२६

३. रिट याचिका क्र.४५७४/२०२६ या प्रकरणी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ

नागपूर यांनी पारित केलेला दि.१०/७/२०२६ रोजीचा न्यायनिर्णय ४. संचालनालयाचे पत्र क्र.१/२०१४५७१/२०२६/दि.१०/७/२०२६

५. संचालनालयाचे पत्र क्र. १/२०५२७३५/दि.३०/७/२०२६

विषयांकित प्रकरणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दि.२९/७/२०२६ मध्ये जिल्हा परिषद आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठीची कालबध्द कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. त्यानुसार संचालनालयाचे संदर्भ क्र.५/१/२०५२७३५/दि.३०/७/२०२६ रोजीच्या पत्रान्वये आपणांस कार्यवाही करणेबाबत कळविण्यात आलेले होते.

परंतु शालेय शिक्षण विभागाच्या दि.२९/७/२०२६ रोजीच्या शासन निर्णयाला मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल रिट याचिका क्र. ५९४३/२०२६ अन्वये आव्हान देण्यात आले असून मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने २९-७-२०२६

रोजी जारी केलेल्या शासन निर्णयातील खंड ४(अ) च्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात आलेली आहे.

त्यामुळे सन २०२६ च्या माहे ऑगस्ट मधील (शासन निर्णयातील ४ अ नुसार) चालू वर्षी करावयाच्या पदोन्न्तीबाबतची कार्यवाही शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत.

शासन निर्णय pdf download

Related posts:

Leave a Comment