विविध क्षेत्रातील नामवंत व प्रतिष्ठित व्यक्तींची नोंद (Marked Electors) मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करण्याबाबत sir marked electors 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विविध क्षेत्रातील नामवंत व प्रतिष्ठित व्यक्तींची नोंद (Marked Electors) मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करण्याबाबत sir marked electors

महोदय/महोदया,

भारत निवडणूक आयोगाने दिनांक १४ मे, २०२६ रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision- SIR) कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत या कार्यालयामार्फत वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. विशेष सखोल पुनरीक्षण (SIFR) कार्यक्रमामध्ये “Marked Electors” हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून विविध क्षेत्रातील नामवंत / प्रतिष्ठित व्यक्ती व त्यांचे कुटुंबिय मतदार यादीमध्ये “Marked Electors” म्हणून चिन्हांकित करणे आवश्यक आहे, जेणेकरून अशा व्यक्तींची नावे मतदार यादीतून अनवधानाने वगळली जाणार नाहीत.

२. भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भात दिनांक २४.०६.२०२५ रोजी निर्गमित केलेल्या आदेशातील Annexure-B, मुद्दा क्र. ४ “Publication of Draft Roll” मधील उपमुद्दा (d) मध्ये पुढीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेत :-

“All names of members of judiciary, public representatives, holders of declared offices and personalities from fields of arts, culture, journalism, sports and public services etc. earlier flagged in the electoral database, are to be included in the draft Electoral Rolls, so that necessary documents can also be collected during the period of Claims and Objections.”

३. उपरोक्त निर्देशांच्या अनुषंगाने, विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रातील नामवंत / प्रतिष्ठित व्यक्ती व त्यांचे कुटुंबिय यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट होण्यापासून वंचित राहणार नाहीत, याची खात्री करण्यात यावी. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रातील नामवंत/प्रतिष्ठित व्यक्ती व त्यांचे कुटुंबिय यांची नावे “Marked Electors” म्हणून योग्यरीत्या चिन्हांकित करण्यात आली आहेत, तसेच त्यांचा समावेश प्रारूप मतदार यादीमध्ये करण्यात आलेला आहे, याची संबंधित मतदार

नोंदणी अधिकारी यांनी स्वतः खातरजमा करावी. याबाबतची कागदपत्रे आवश्यक असल्यास दावे व हरकती या कालावधीत घेण्यात यावीत.

४. आपल्या जिल्ह्यांतर्गत ज्या मतदार संघामध्ये विविध क्षेत्रातील नामवंत / प्रतिष्ठित व्यक्ती व त्यांचे कुटुंबिय नव्याने स्थायिक झालेले आहेत, त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत किंवा कसे, तसेच विविध क्षेत्रातील नामवंत / प्रतिष्ठित व्यक्ती व त्यांचे कुटुंबिय आपल्या मतदार संघातून इतर ठिकाणी वास्तव्याकरीता गेलेले आहेत त्यांचे नाव नवीन ठिकाणी मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याची खात्री केल्यानंतरच त्यांचे नाव विहित कार्यपध्दती अवलंबून मतदार यादीतून वगळण्यात यावे.

५. काही कारणास्तव विविध क्षेत्रातील नामवंत / प्रतिष्ठित व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंबियांपैकी एखाद्या व्यक्तीचे नाव वगळावयाचे असल्यास त्याबाबत सबळ कारणाची खात्री पटल्यानंतर विहित कार्यपध्दती अवलंबून नाव वगळण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.

६. तसेच, ज्या नामवंत / प्रतिष्ठित व्यक्ती किंया त्यांचे कुटुंबिय यांनी त्यांच्या तपशिलामध्ये सुधारणा सुचविलेल्या असतील (नमूना-८) किंवा नवीन नावांचा समावेश करण्याकरीता नमूना-६ भरुन दिला असेल, अशा प्रकरणांमध्ये नमुने स्विकृत करण्यात यावेत. तथापि, त्याबाबतची कार्यवाही प्रारुप यादी प्रसिध्द झाल्यानंतर करण्यात यावी. अशाप्रकारे करण्यात आलेल्या कार्यवाहीची खातरजमा करून त्याबाबतचे प्रमाणपत्र प्रत्येक जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी संकलित करून दिनांक १७.०८.२०२६ पर्यंत या कार्यालयास सादर करावे.

७. विविध क्षेत्रातील नामवंत / प्रतिष्ठित व्यक्ती व त्यांचे कुटुंबिय यांची नावे मतदार यादीत समाविष्ट होण्याच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये तसेच महानगरपालिका मुख्यालयात एक “व्हिआयपी कक्ष (VIP)” स्थापन करण्यात यावा, सदर कक्षामार्फत विविध क्षेत्रातील नामवंत / प्रतिष्ठित व्यक्ती व त्यांचे कुटुंबिय यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबत समन्वय साधण्यात यावा, ही विनंती.

सोबत प्रमाणपत्राची प्रत जोडली आहे.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment