PRASHAST ॲप २.० ची अंमलबजावणी करणे आणि सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे १००% स्क्रिनिंग (तपासणी) पूर्ण करण्याबाबत prashast application amalbajavani
संदर्भ: १) भारत सरकारचे पत्र क्र.F. No. ९-६/२०२४-१७.१८ दिनांक: ०८ जून २०२६.
२) मा. राज्य प्रकल्प संचालक यांचे पत्र क्र. मपाशिप / समग्र शिक्षा/IE/२०२६-२७/दि.२४/०६/२०२६.
३) या कार्यालयाचे पत्र जा.क्र./जिप/शिक्षण/प्राथ./स.शि./४५०/२०२६ पुणे दि. २९/०६/२०२६.
४) मा. राज्य प्रकल्प संचालक यांचे पत्र क्र. मपाशिप / समग्र शिक्षा/IE/प्रशस्त २.०/२०२६-२७/दि.२४/०७/२०२६.
५) या कार्यालयाचे पत्र जा.क्र./जिप/शिक्षण/प्राथ./स.शि./५५०/२०२६ पुणे दि. ३०/०७/२०२६.
वरील संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते कि, उपरोक्त संदर्भिय क्र.२ व ३ अन्वये आपणास खालील प्रमाणे कळविण्यात आले होते.
1) PRASHAST App २.० हे अॅप कार्यान्वित होताच मुख्याध्यापक/प्राचार्य आणि इतर संबंधित वापरकर्त्यासाठी संस्थात्मक लॉगिन (institutional login) सक्रिय केले जातील याची खात्री करावी.
ii) आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांनी सप्टेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत शाळेत प्रवेशित १००% विद्यार्थ्यांचे PRASHAST App २.० द्वारे तपासणी (screening) पूर्ण केले आहे याची खात्री करावी.
PRASHAST App २.० चा वापर आणि तपासणी प्रक्रीयेबाबत शिक्षक व विशेष शिक्षकांना मार्गदर्शन व क्षमता वृद्धी करणे (capacity building) कार्यक्रमांना चालना देणे; आणि
iv) PRASHAST App २.० द्वारे तपासणी (screening) ची कामे वेळेत पूर्ण होतील याची खात्री करण्यासाठी प्रगतीचा नियमित आढावा घेणे.
संदर्भिय पत्र क्र. ४ अन्वये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे पत्रानुसार प्रशस्त २.० अॅप बाबत वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्याबा बत आपणांस कळविण्यात आलेले आहे,
तथापि, प्रशस्त २.० अॅपबाबतची व्हिडीओ पाहण्याची कार्यवाही जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळेतील मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक व विशेष शिक्षक यांनी केवळ ४.४६% शिक्षकांनीच प्रशस्त अॅपवरील १० व्हिडीओ पाहिले आहेत. ही अतिशय गंभिर बाब आहे. दि. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपल्या तालुक्यातील १००% शिक्षकांनी ह्या १० व्हिडीओच्या माध्यमातून स्वतः अद्ययावत माहिती प्राप्त
करुन घेणे बंधनकारक आहे. एक व्हिडीओ केवळ पाच मिनिटांचाच असे १० व्हिडिओ साधारणपणे ५५ मिनिटांचे आहेत.
दिनांक १ सप्टेंबर २०२६ पासून प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्क्रिनिंग करायचे आहे. त्यासाठी सर्व शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत असणे आवश्यक आहे. आपल्या अधिनस्त तालुक्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या सर्व शाळेतील १००% शिक्षक सदर १० व्हिडीओ पाहून स्वतःला अद्ययावत करतील व पार्ट-१ मधील माहिती भरण्यास मदत होईल. यासाठी सर्व विशेषतज्ञ व विशेष शिक्षक यांचा दि. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नियमित आढावा घ्यावा.










