शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या निवड प्रक्रियेबाबत pavitra portal shikshak bharti
उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना (TAIT-2025)
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या निवड प्रक्रियेबाबत
१. पवित्र पोर्टलवर सध्या स्व- प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या १,७०,१०८ उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरु आहे. खालील प्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहे.
A) दिनांक १६/०८/२०२६ अखेर मुलाखतीशिवाय १,५१,०२०, मुलाखतीसह- १,४१,८६५ प्राधान्यक्रम पोर्टलवर जनरेट झालेले आहेत.
B) दिनांक १६/०८/२०२६ अखेर मुलाखतीशिवाय १,४६,६५०, मुलाखतीसह १,३१,५०५ प्राधान्यक्रम पोर्टलवर लॉक झालेले आहेत.
२. प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्यासाठी दिनांक ०६.०८.२०२६ ते १६.०८.२०२६ असा कालावधी देण्यात आलेला होता, सदर कालावधीमध्ये उमेदवारांनी प्राध्यान्यक्रम लॉक केलेले आहेत, यासाठी पोर्टलमार्फत उमेदवारांना वेळोवेळी वैयक्तिक SMS, पोर्टलवर सूचना, बुलेटिनच्या माध्यमातून प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत अवगत करण्यात आलेले आहे.
३. काही उमेदवारांनी माहिती नोंद करताना योग्य त्या रकान्यात नोंद न करता अन्य रकान्यात नोंद केली होती त्यांना त्यांची पात्रता योग्य त्या रकान्यात असल्याचे विचारात घेऊन त्यांना देखील निवड प्रक्रियेत येण्यासाठी प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
४. काही उमेदवारांनी स्व प्रमाणपत्राची माहिती पूर्ण केली होती परंतु स्व प्रमाणपत्र Otp नोंद करून लॉक केलेले नव्हते त्यांना देखील त्यांनी नोंद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम उपलब्ध करून निवड प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे.
५. उमेदवारांनी स्व प्रमाणपत्र लॉक करताना आपली शैक्षणिक, व्यावसायिक वा अन्य अर्हताची नोंद स्व प्रमाणपत्रामध्ये केली नसल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्याचे दिसून आले. या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र लॉक करण्याच्या कालावधीमध्ये स्व-प्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी असताना देखील त्यांनी योग्य त्या नोंदी केल्या नाहीत. अशा उमेदवारांना टप्पा -२ मधील पदभरतीच्या वेळी स्व-प्रमाणपत्रामध्ये योग्य त्या वैध दुरुस्ती नोंद करण्याची सुविधा देण्यात येईल.
६. निवडप्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणजे सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे हा असेल. सदर निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने मानवी हस्तक्षेपास कोणताही वाव नाही.
७. मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत (१:१) उमेदवारांची स्व-प्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या माहितीच्या आधारे थेट निवडीसाठी शिफारस होणार आहे, निवडीसाठी शिफारस झालेल्या व्यवस्थापनाकडून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र ठरल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित केले जाणार आहेत.
८. मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत (१:१) निवडीसाठी शिफारस झालेला उमेदवार एकदा शिफारस झाल्यामुळे पुढील या टप्प्यातील मुलाखतीसह तसेच पुढील फेरीसाठी विचारात घेतले जाणार नाही, असे उमेदवार नव्याने TAIT देऊन निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी होऊ शकतील.
९. खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थातील निवड प्रक्रियेत मुलाखतीसह प्रकारात या पूर्वी (१:१०) उमेदवार देण्यात येत होते व ३० गुणांच्या आधारे निवड करण्यात येत होती. निवड प्रक्रियेत उमेदवारांना ० गुण देऊन निवड प्रक्रियेत बाहेर ठेवण्यात येत होते, याबाबी विचारात घेऊन निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने उमेदवार प्रमाण (१:३) असे सुधारित केले आहे, गुणदानामध्ये देखील सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आता मुलाखतीसह प्रकारात उमेदवारांच्या TAIT परीक्षेतील गुण (७५ गुण), शैक्षणिक (७ गुण) व व्यावसायिक अर्हतेसाठी (८ गुण), मुलाखत व अध्यापन कौशल्य (१० गुण) असे एकूण १०० गुणांच्या आधारे अंतिम निवड होणार आहे.
१०. पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेत कोणी त्रयस्थ व्यक्ती निवड करून देण्याचे आश्वासन असेल अथवा खोटे प्रलोभन देत असेल तर त्यास प्रतिसाद देऊ नये व आपले नुकसान करून घेऊ नये.
११. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर निवड करण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास येत असल्यास वा लाचेची मागणी करीत असल्यास तातडीने नजीकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयास टोल फ्री क्रमांक १०६४ यावर तातडीने संपर्क साधावा.
१२. राज्यातील ७६ अनुदानित शैक्षणिक संस्थांनी एकूण १८१९ पदांसाठी मुलाखतीशिवाय (१:१) ही विना मुलाखत निवड प्रक्रिया निवडून निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना देखील स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणे विनामुलाखत प्रक्रियेतून थेट उमेदवार उपलब्ध होणार आहेत. निवड प्रक्रियेत या अनुदानित शैक्षणिक संस्थांचे हार्दिक अभिनंदन.
१३. उमेदवारांनी देखील आपले प्राधान्यक्रम वेळेत लॉक केले आहेत, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.
१४. प्राधान्यक्रम नोंद केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या निवडीसाठी विभागातर्फे हार्दिक शुभेच्छा.










