वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२६ पात्र शिक्षकांची नोंदणीसाठी माहिती मागविणेबाबत varishtha vetan shreni training registration
महोदय,
उपरोक्त विषयात नमूद केल्यानुसार, प्राथमिक, माध्यमिक, उच्च्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय, कला, क्रीडा (पूर्ण वेळ) या स्तरावर सेवेची १२/२४ वर्ष पूर्ण केलेले पात्र शिक्षक यांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण देणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत नियोजन सुरू आहे. त्यासाठी पात्र प्रशिक्षणार्थीची पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी करून घेतली जाणार आहे. ज्या शिक्षकांना शालार्थ आयडी प्राप्त आहे, अशा शिक्षकांची नोंदणी शालार्थ आयडी च्या मदतीने केली जाणार आहे. पात्र प्रशिक्षणार्थीनी शालार्थ / सेवार्थ आयडी वापरूनच नोंदणी करणे बंधनकारक आहे.
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी जे शिक्षक दिनांक ३० नोव्हें २०२६ पर्यंत सेवेची १२/२४ वर्ष पूर्ण करत आहेत असे शिक्षक व ३० जून २०२७ पर्यंत १२/२४ वर्ष सेवा पूर्ण करणारे व ३० जून २०२७ अखेर सेवानिवृत्त होणारे शिक्षक यांचा प्रशिक्षणामध्ये समावेश केला जाणार आहे. अशा शिक्षकांच्या माहितीचा API किंवा Excel sheet मधील Data (सोबत दिलेल्या मुद्याचे आधारे) सेवापूर्व विभागाच्च्या preserviceedudept@maa.ac.in या email Id वर English व मराठी मध्ये दि. ३ सप्टेंबर २०२६ सायं. ५ वाजे पर्यंत उपलब्ध करून द्यावा ही विनंती. सदरील माहिती उपलब्ध करून दिल्यास पात्र शिक्षकांना प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल. दिनांक ०३.०९.२०२६ नंतर माहिती उपलब्ध झाल्यास सदरील माहितीचा विचार करण्यात येणार नाही.
(संपर्क – श्री. सोनवणे ९५११८७४३७३ बाळकृष्ण वाटेकर सहा. संचालक – ९२८४४८८२१८)









