शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत pavitra portal shikshak bharti
संदर्भ
:- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक सीईटी-२०१५/ प्रक्र
१४९/टीएनटी-१ दिनांक ०७/०२/२०१९.
२. शासन निर्णय क्रमांक क्र. संकिर्ण-२०१८/प्रक्र३११/टीएनटी-१ दिनांक १/०१/२०१९.
३. शासन निर्णय क्र संकिर्ण-२०२२/प्रक्र १०६/टीएनटी-१ दिनांक १०/११/२०२२
४. शासन निर्णय क्र संकिर्ण-२०२३/प्रक्र१७४/टीएनटी-१ दि.२१/०६/२०२३
५. शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०१८/प्रक्र ३९७/टीएनटी-१ दि.०७/०२/२०१९,
शुद्धिपत्रक दिनांक २५/०२/२०१९,दि.१६/०५/२०१९ व दि.१२/०६/२०१९
६. शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२३/प्रक्र ५०९/टीएनटी-१ दि.१३/१०/२०२३
७. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक ०१/०१/२०२६, दि.२०/०१/२०२६, दि.३०/०३/२०२६, दि.०२/०४/२०२६ व दिनांक २४/०७/२०२६
८. आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक ०९/०६/२०२६
९. पवित्र पोर्टलवर मुखपृष्ठावरील उमेदवारांसाठी/व्यवस्थापनांसाठी वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या सूचना
उपरोक्त शासन निर्णय व सूचना कृपया पाहाव्यात.
१. उमेदवाराने स्व-प्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवडीसाठी तात्पुरती शिफारस पवित्र पोर्टलमार्फत करण्यात आलेली आहे. नियुक्तीच्या अगोदर कोणत्याही टप्प्यावर स्व-प्रमाणपत्रात नोंद केलेली माहिती मूळ कागदपत्रांच्या/प्रमाणपत्रांच्या आधारे तपासण्यात यावी व त्याच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवारास नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यात यावी.
२. या संदर्भात आपणांस खालील प्रमाणे सूचित करण्यात येत आहेत.
३. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे.
४. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ मध्ये प्रविष्ट उमेदवारांना पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित करण्याची तसेच त्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली होती. असे असले तरी, वास्तरावरून उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नाही.
५. शिक्षण सेवक पदभरतीसाठी दिनांक ०१/०५/२०२६ ते २०/०७/२०२६ या कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली बिंदुनामावली व विषयनिहाय रिक्त पदांच्या माहितीची नोंद पवित्र पोर्टलवर जाहिरात विषयक नोंद करण्यात आलेली आहे. बिंदुनामावली, गट व विषयनिहाय रिक्त पदांच्या जाहिरातीची माहिती पोर्टलवर एकत्रित स्वरूपात डाऊनलोड या मेनुअंतर्गत उपलब्ध आहेत, तसेच व्यवस्थापनांनी वर्तमानपत्रामध्ये जाहिरातदेखील दिलेली आहे. सदर जाहिरातीस अनुसरून उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांना विविध व्यवस्थापनांमधील रिक्त पदाकरिता त्यांच्या पात्रतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारामध्ये स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
६. काही खाजगी व्यवस्थापनांनी पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय पदभरती हा पर्याव निवडलेला आहे.
७. उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करताना उमेदवारांस अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ मध्ये प्राप्त असलेले गुण, बिंदुनामावलीनुसार आरक्षण, जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय तसेच उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती या सर्व बाबी एकत्रित विचारात घेण्यात आलेल्या आहेत.
८. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) व्यवस्थापनाच्या
लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
९. उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदाकरिता उमेदवारांची पात्रता तपासून पात्र असल्यासच त्याच्या नियुक्तीबाबतची पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्व-प्रमाणपत्र व त्यासोबत अपलोड केलेली कागदपत्रे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
१०. याबाबत स्पष्ट करण्यात येते की, उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावरच करण्यात आलेली आहे. परिणामी स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची व आवश्यक्त पात्रतेच्या कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे.
११. उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्याअनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्रे/प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्रांशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरविता येणार नाही, याची कटाक्षाने नोंद घ्यावी.
१२. समांतर आरक्षणाचा (महिला आरक्षण वगळून) दावा केलेल्या उमेदवारांबाबतीत कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी त्यांनी केलेल्या दाव्याची पडताळणी मूळ प्रमाणपत्रांवरून सक्षम प्राधिकारी यांच्याकडून करण्यात यावी. पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबतची कार्यवाही करावी.
१३. उमेदवाराच्या मूळ कागदपत्रांबाबत शंका/संशय असल्यास त्या बाबतची देखील खातरजमा संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी तत्काळ करावी.
१४. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) गैरप्रकार प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं.५६/२०२१ व ५८/२०२१ अन्वये गुन्हे दाखल झालेले आहेत. सदर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दिनांक ०३/०८/२०२२ व दिनांक १४/१०/२०२२ रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. सदर यादीतील उमेदवारांची पवित्र पोर्टलमार्फत नियुक्तीसाठी शिफारस झाली असल्यास, अशा उमेदवारांची शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्रमांक संकिर्ण-२०२४/प्रक्र ०३/टीएनटी-१ दिनांक १२/०१/२०२४ नुसार चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय व शासन पत्र दिनांक २९/०८/२०२५ व त्यासोबतचे हमीपत्र घेतल्याशिवाय नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येऊ नये.
१५. उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय दिनांक २१/०६/२०२३ अन्वये जिल्हा परिषदेमध्ये “शिक्षण सेवक” पदावर नव्याने नियुक्ती झालेल्या उमेदवारांस जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही, असे नियुक्ती आदेशामध्ये नमूद करावे.
१६. उपरोक्त शिवाय उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करताना प्रामुख्याने खालील बाबी पाहाव्यात.
१६.१ उमेदवाराने त्यांची शैक्षणिक अर्हता दिनांक १४/०५/२०२५, व्यावसायिक अर्हता दिनांक २५/०९/२०२५ या दिनांकापर्यंतच धारण करणे आवश्यक आहे. उपरोक्त दिनांकानंतर प्राप्त केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पात्रतेसाठी ग्राहय धरता येणार नाही याची नोंद घ्यावी.
१६.२ उमेदवारांचे वय “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” करिता अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच दिनांक १४/०५/२०२५ रोजीचे वय नियुक्तीसाठी विचारात घेण्यात यावे. (सुलभ संदर्भासाठी वयाच्या सवलतीबाबतचा तक्ता जोडला आहे)
१६.३ खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी (इ.९ वी ते इ १२ वी) खाजगी शाळांच्या सेवा शर्ती नियमानुसार कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे खाजगी शाळांतील या गटासाठी कमाल वयोमर्यादा लागू राहणार नाही.
१६.४ जन्म तारखेच्या पुराव्यासाठी शालान्त परीक्षा प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला विचारात घेण्यात यावा.
१६.५ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसंदर्भात शासन निर्णय दिनांक ०७/०२/२०१९ मधील तरतुदी व शासन
शुद्धिपत्रक दिनांक २५/२/२०१९, १६/०५/२०१९ व १२/०६/२०१९ सुधारणेसह यामधील इ. १ ली ते इ. ५ वीसाठी परिशिष्ट-अ. इ. ६ वी ते इ. ८ वीसाठी परिशिष्ट-ब, इ. ९ वी ते इ. १० वीसाठी परिशिष्ट-क, इ. ११ वी ते इ. १२ बीसाठी परिशिष्ट-ड विचारात घेण्यात यावे. खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांतील इ. ९ वी ते इ. १० वी साठी पदवीस्तरावर उत्तीर्ण श्रेणी आवश्यक आहे.
१६.६ इ. १ ली ते इ. ५ वी या गटासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET/CTET)- Paper-1 पात्र असणे आवश्यक आहे.
१६.७ इ. ६ वी ते इ. ८ वी या गटातील गणित, विज्ञान व गणित-विज्ञान या विषयांच्या पदांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET/CTET) – Paper-2 गणित-विज्ञान विषय घेऊन पात्र असणे आवश्यक आहे.
१६.८ इ. ६ वी ते इ. ८ वी या गटातील इतिहास, भूगोल व सामाजिकशास्त्र या विषयांच्या पदांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET/CTET)- Paper-2 सामाजिकशास्त्र विषय घेऊन पात्र असणे आवश्यक आहे.
१६.९ इ. ६ वी ते इ. ८ वी या गटातील भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड इत्यादी) या विषयांच्या पदांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET/CTET) – Paper-2 गणित-विज्ञान अथवा सामाजिकशास्त्र विषय घेऊन पात्र असणे आवश्यक आहे.
१६.१० खाजगी व्यवस्थापनातील इ. ९ वी ते इ. १० वी साठी पदवीस्तरावर किमान उत्तीर्ण श्रेणी व इ. ११ वी ते इ. १२ वी साठी पदव्युत्तरस्तरावर किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (१६.५ करिता सुलभ संदर्भासाठी उत्तीर्णतेच्या सवलतीबाबतचा तक्ता जोडला आहे)
१७. उमेदवाराने स्वप्रमाणित केलेली माहिती तपासण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्राची पडताळणी करावी.
१७.१ उमेदवाराने पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत.
१७.२ शालान्त परीक्षा गुणपत्रक व गुणपत्रक (जन्म तारखेसाठी)
१७.३ उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र (इ. १ ली ते इ. ५ वी गटातील पदांसाठी)
१७.४ डी.एड./डी.एल.एड./डी.टी.एड./टी.सी.एच. बेळगांव गुणपत्रक व प्रमाणपत्र (इ. १ ली ते इ. ५ वी गटातील पदांसाठी)
७.५ शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी/सीटिईटी) गुणपत्रक व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
१७.६ पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र (इ. ६ वी ते इ. ८ वी/इ. ९ वी ते इ. १० वी गटातील पदांसाठी)
१७.७ व्यावसायिक अर्हतेसाठी डी.एड. डी.एलएड./बी.ए.एलएड./बी.एस्सीएड./बी.एड./
१७.८ बी.पी.एड. (फक्त शारिरिक शिक्षण विषयासाठी)
१७.९ पदव्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक वा प्रमाणपत्र (इ. ११ वी ते इ. १२ वी गटातील पदांसाठी)
१७.१० स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदांसाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र अथवा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांतील रहिवासी असल्याचा दाखला.
१७.११ जातीचा दाखला/जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
१७.१२ जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
१७.१३ दिव्यांग समांतर आरक्षणातील लाभासाठी किमान ४० टक्के दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र
१७.१४ समांतर आरक्षणातील लाभासाठी माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र (या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभकेवळ स्वतः माजी सैनिक उमेदवार याना व शहीद सैनिकांच्या वारसांना लाभ अनुज्ञेय आहे.)
१७.१५ समांतर आरक्षणातील लाभासाठी पदवीधर अंशकालीन असल्याचे सक्षम प्राधिकारी (तहसीलदार)
प्रमाणपत्र. (या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तहसीलदार यांचे प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना अनुज्ञेय राहील. तथापि, शाळा/उच्च माध्यमिक विभागामध्ये अर्धवेळ, अंशकालीन, तासिका तत्वावर काम केलेल्या उमेदवारांना या प्रवर्गाचा लाभ अनुज्ञेय नाही.)
१७.१६ समांतर आरक्षणातील लाभासाठी प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र (एकवेळ नोकरीच्या लाभासाठी पात्र)
१७.१७ समांतर आरक्षणातील लाभासाठी भूकंपग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र (एकवेळ नोकरीच्या लाभासाठी पात्र)
१७.१८ समांतर आरक्षणातील लाभासाठी प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याचा संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल.
१७.१९ समांतर आरक्षणातील लाभासाठी अनाथ असल्याचे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र
१७.२० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र
१७.२१ सन १९९१ चे जनगणना/१९९४ चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र
१७.२२ उन्नत गटात मोडत नसल्याबाबत (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र
१७.२३ उमेदवाराच्या नावात बदल झाला असल्यास त्याबाबतचा पुरावा (विवाहनोंदणी प्रमाणपत्र, राजपत्र इ.)
१८ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ साठी प्रविष्ट होताना दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना वेळेची सवलत, मदतनीस, प्रश्नांची संख्या कमी इत्यादी प्रकारच्या सवलतींचा लाभ देण्यात आलेला आहे. अशा उमेदवारांकडे स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या दिव्यांगत्वाचे योग्य प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी. ज्या दिव्यांग उमेदवाराची नियुक्तीसाठी शिफारस दिव्यांग प्रवर्गात न होता, त्यांच्या पात्रतेनुसार अन्य प्रवर्गातून झाली असेल, तरीही अशा दिव्यांग उमेदवाराच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी. अशा उमेदवाराकडे संबंधित कागदपत्रे/प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. कागदपत्रे/प्रमाणपत्रे नसल्यास असे उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही.
१९ कागदपत्र पडताळणीअंती नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची चारित्र्यपडताळणी सक्षम प्राधिका-यामार्फत करण्यात यावी. ( पोलीस खात्यामार्फत चारित्र्यपडताळणी आवश्यक)
२० नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार शारिरिकदृष्ट्या पात्र असल्याची तपासणी सक्षम प्राधिका-यामार्फत करण्यात यावी.
२१ उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी, पात्र/अपात्रतेची कारणे, उमेदवारांचा रुजू अहवाल इत्यादीबाबत पवित्र पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक त्या नोंदी आपल्या लॉगीनवर कराव्यात.
२२ विविध शासन निर्णयातील तरतुदीनुसार उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करावी. अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील याची नोंद घ्यावी.
२३ शिफारस झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपूर्वी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीची कार्यवाही दिनांक ०२/०९/२०२६ ते ०५/०९/२०२६ या कालावधीत तर पात्र असलेल्या उमेदवारांना पदस्थापनेबाबत समुपदेशनाची कार्यवाही दिनांक ०७/०९/२०२६ ते ११/०९/२०२६ या कालावधीत करण्याचे नियोजन करण्यात यावे. तथापि, उमेदवारांची संख्या कमी असल्यास पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही दिनांक ०५/०९/२०२६ पूर्वी करण्यात यावी.
वरीलप्रमाणे कार्यवाही करून नियुक्तीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारांना शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय दिनांक २१/०६/२०२३ मधील मुद्दा क्रमांक ७ मधील तरतुदी व इतर तरतुदी विचारात घेऊन समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी.









