दिनांक १७ सप्टेंबर, २०२६ रोजी “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करणेबाबत marathwada muktisangram day celebration
संदर्भ :
१. महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. सार्वसू-११९७/१३७८/प्र.क्र.१७७/९७/२९, दि. १७.३.१९९८.
२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०००/प्र.क्र.२७६/स्वासैक-१, दि.०४.०५.२००१.
३. सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. एफएलजी-१००१/प्र.क्र.२१/१/३०, दि.११.०९.२००१.
४. महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. विसआ-१००७/४९९/प्र.क्र.६३/२००७/२९, दिनांक २८.०६.२००७.
महोदय/महोदया,
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभांग, क्र. संकीर्ण-२०००/प्र.क्र.२७६/स्वासैक-१, दिनांक ०४.०५.२००१ अन्वये, मराठवाडा विभागातील सर्व जिल्हयांमध्ये दिनांक १७ सप्टेंबर हा दिवस कायम स्वरुपी “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शासन परिपत्रक, क्र. एफएलजी-१००१/प्र.क्र.२१/१०/३०, दिनांक ११.०९.२००१ अन्वये, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
२. शासन अधिसूचना, दि.२७.०३.१९९८ अन्वये, मराठवाडा विभागातील सर्व तालुक्यांमध्ये आणि शासन अधिसूचना, दिनांक २८.०६.२००७ अन्वये, चंद्रपूर जिल्हयातील मूळ निजामशासित
कोरपणा, राजुरा व जिवती या तीन तालुक्यांमध्ये दिनांक १७सप्टेंबर या दिवशी “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन” म्हणून सुट्टी घोषित केली आहे.
३. या अनुषंगाने दि. १७ सप्टेंबर, २०२६ या दिवशी विभागीय मुख्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच जिल्हा मुख्यालये, उपविभागीय मुख्यालये येथे ध्वजारोहण समारंभ साजरा करण्यासाठी खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेतः-
१) विभागीय मुख्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे प्रथेनुसार मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ साजरा करण्याची व्यवस्था करावी.
२) उर्वरित जिल्ह्यांनी मुख्यालयाच्या व अन्य ठिकाणी ध्वजारोहण समारंभ साजरा करण्याची व्यवस्था करावी.
३) विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर हे त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी वेगळी व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही.
४) मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर वगळता उर्वरित ७ जिल्ह्यांमध्ये, संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे. सदरची बाब आजच संबधित जिल्हाधिकारी यांनी संबंधित पालकमंत्री कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावी. एखाद्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री यांना काही प्रशासकीय कारणास्तव उपस्थित राहणे शक्य नसल्यास, संबधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी स्वतः ध्वजारोहण करावे,
५) ज्या जिल्हयांमध्ये पालकमंत्री नियुक्त आहेत तेथे पालकमंत्री ध्वजारोहण करतील. तसेच ज्या जिल्हयांमध्ये पालकमंत्री नियुक्त नाहीत तेथे त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील.
६) मराठवाडयातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा, राजुरा व जिवती या तीन तालुक्यांमध्ये संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी उपविभागीय मुख्यालयात व तहसिलदार यांनी तालुका मुख्यालय येथे ध्वजारोहण करावे.
७) मराठवाडा मुक्ती दिनी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपूर्ण मराठवाडा विभागात व चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा, राजुरा व जिवती या तीन तालुक्यामध्ये एकाच वेळी सकाळी ९.०० वाजता आयोजित करण्यात यावा,
८) जिल्हयातील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमास/समारंभास जिल्हयातील माननीय खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, स्वातंत्र्य सैनिक, आणीबाणीच्या काळात बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना, महानगरपालिका / नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थाचे मा. महापौर, मा. नगराध्यक्ष मा. जिल्हापरिषद अध्यक्ष व इतर पदाधिकारी, नगरसेवक, राजकीय पक्षांचे स्थानिक प्रमुख, दलित मित्र पुरस्कार व शासकीय पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि स्थानिक मान्यवर नागरिक/समाजसेवक, सैन्यदलातील शौर्य चक्र व इतर पदक विजेते इत्यादींना उपस्थित राहण्याचे निमंत्रण द्यावे. तसेच माजी पदाधिकारी अधिकारी यांना देखील निमंत्रित करण्यात यावे.
९) ध्वजारोहणसंदर्भात संदर्भाधीन क्र.३ येथील शासन परिपत्रकामधील सूचनांचे काटेकोरपणे अनुपालन होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
१०) समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा.
११) अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहाता यावा यासाठी कार्यक्रमाचे वेबसाइटद्वारे थेट प्रक्षेपण करावे.










