विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ sir paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ sir paripatrak 

जुळवणी न झालेले मतदार तसेच जुळवणी झालेले परंतू तार्किक विसंगती (Logical Discrepancy) असलेल्या मतदारांना देण्यात यावयाच्या नोटीसांसंदर्भात सूचना.

संदर्भ :

१) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक- २३/२०२५-ERS (Vol-1l).

दिनांक १४.०५.२०२६.

२) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक- २३/२०२६-ERS (Vol-II). दिनांक १९.०८.२०२६.

३) या कार्यालयाचे समक्रमांकाचे पत्र दि.०४.०९.२०२६.

महोदय/महोदया,

भारत निवडणूक आयोगाच्या निदेशांनुसार, राज्यात सुरु असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार यादी दिनांक ३१.०८.२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर यादीमध्ये समाविष्ट असलेल्या ज्या मतदारांची मागील SIR मधील नोंदींशी जुळवणी झालेली नाही (Unmapped Electors) तसेच मागील SIR मधील नोंदींशी जुळवणी झालेली आहे परंतू त्यामध्ये तार्किक विसंगती आढळलेली आहे (Mapped Electors with Logical Discrepancies) अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाच्या ECINET पोर्टलवर ERO/AERO लॉगीन मध्ये नोटीसा उपलब्ध झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेतः

१) भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक १९.०८.२०२६ रोजीच्या पत्रातील सुधारीत वेळापत्रकानुसार दिनांक ३१.०८.२०२६ ते दि. २९.१०.२०२६ हा कालावधी सदर नोटीशींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

२) आयोगाकडून ECINET पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नोटीसा तात्काळ डाऊनलोड करण्याची कार्यवाही करण्यात यावी. आयोगाच्या दिनांक २४.०७.२०२६ रोजीच्या PPT मध्ये यासंदर्भातील सविस्तर SOP नमूद करण्यात आलेली आहे व सदर PPT आपणांस यापूर्वीच उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

३) भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक १४.०५.२०२६ रोजीच्या पत्रासोबतच्या सहपत्र ब (Detailed Guidelines for Special Intensive Revision) मध्ये परिच्छेद ४(व) येथे खालीलप्रमाणे नमूद केले आहे:

All names of member of judiciary, public representatives, holders of declared offices and personalities from fields of arts, culture, journalism, sports, and public services etc. earlier flagged in the electoral database, are to be included in the draft Electoral Rolls, so that necessary documents can also be collected during the period of Claims and Objections.”

आयोगाच्या उपरोक्त सुचना विचारात घेता मतदार यादीमध्ये वरीलप्रमाणे विविध क्षेत्रातील महत्वाच्या चिन्हांकित व्यक्तिंची नावे मतदार यादीत समाविष्ट होतील याची दक्षता घ्यावयाची आहे. सबब, अशा चिन्हांकित व्यक्तींसाठी जुळवणी न झाल्याबद्दल किंवा तार्किक विसंगती असल्याबद्दल नोटीसा न देता, प्रथमतः अशा मतदारांशी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी / सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी थेट संपर्क करुन त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्र / दस्तावेज उपलब्ध करुन घ्यावयाचे आहेत. सदर दस्तावेज व्हॉट्सअॅप सारख्या संदेश माध्यमाद्वारे / ई-मेल द्वारे किंवा संबंधित मतदाराच्या घरी BLO ने प्रत्यक्ष भेट देऊन उपलब्ध करुन घेता येतील. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या पोर्टलवर कागदपत्र / दस्तावेज अपलोड करण्याबाबत सुविधा उपलब्ध आहे. सदर कागदपत्रांची/ दस्तावेजांची पडताळणी केल्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून या अनुषंगाने उचित निर्णय घेण्यात यावा.

४) वरील मतदारांव्यतिरिक्त अन्य मतदारांना सुध्दा या प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण / गैरसोय होणार नाही यादी दक्षता घेणे आवश्यक आहे. या करिता प्रथमतः सदर नोटीसा संबंधित मतदाराच्या गणना प्रपत्रामध्ये नमूद असलेल्या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअॅपसारख्या संदेश माध्यमाद्वारे पाठविण्याचा पर्याय वापरता येईल. तसेच संबंधित मतदाराने व्हाट्सअॅपसारख्या संदेश माध्यमाद्वारे किंवा ईमेलद्वारे किंवा वर नमूद भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या पोर्टलवर आवश्यक कागदपत्र/दस्तावेज अपलोड करुन उपलब्ध करुन दिल्यास त्यांची पडताळणी करुन सदर कागदपत्रे योग्य व पुरेसे असल्यास मतदार नोंदणी अधिकारी यांना पुढील कार्यवाही करता येईल. परंतु, दस्तावेज अपूर्ण आहेत / पूरेसे नाहीत या कारणामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित मतदाराला प्रत्यक्षात नोटीस बजावणे, त्याची पोचपावती घेणे, सुनावणी घेणे अनिवार्य राहील व अशा मतदारासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापुर्वी सदर मतदारास उचित कागदपत्र/ दस्तावेज उपलब्ध करुन देण्यास पुरेशी संधी देणे आवश्यक आहे.

५) सदर नोटीस मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असुन त्याप्रमाणे केवळ एका प्रतीमध्ये (पाठपोट) छापून घ्यावयाची आहे. संबंधित मतदारांकडुन घ्यावयाची पोचपावती (Acknowledgement Receipt) त्याच नोटीशीच्या शेवटी छापण्यात आली असुन मतदाराला नोटीस उपलब्ध करुन दिल्यानंतर सदर पोचपावती घ्यावयाची आहे.

६) तार्किक विसंगती आढळलेल्या मतदारांच्या अनुषंगाने ECINET वर उपलब्ध असलेल्या पर्यायाचा वापर करुन निर्णय घेण्यात यावा.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment