इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ एन.सी.एल. आणि ई.डब्ल्यू.एस प्रमाणपत्राबाबत eleventh online addmission

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ एन.सी.एल. आणि ई.डब्ल्यू.एस प्रमाणपत्राबाबत eleventh online addmission 

उपरोक्त विषयान्वये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील राज्यातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत पहिल्या नियमित फेरीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रवेश प्रक्रियेत एन.सी.एल. आणि ई.डब्ल्यू.एस प्रवर्गातून प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना एन.सी.एल. आणि ई.डब्ल्यू.एस चे प्रमाणपत्र सादर करावे लागते. विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने प्रमाणपत्र सादर करण्याबाबत मुदत तथा याबाबत पर्याय उपलब्ध करुन देण्याबाबत संचालनालयास तथा राज्य प्रवेश नियंत्रण समितीस विद्यार्थी / पालक, विविध संघटनांकडून विनंती करण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने याबाबत आपणास कळविण्यात येते की, सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करतेवेळी एन.सी.एल. / ई.डब्ल्यू.एस प्रमाणपत्र नसणा-या विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती किंवा हमीपत्र घेवून ३ महिन्यांची मुदत देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्याबाबत आपल्या अधिनस्त प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात यावे.

Related posts:

Leave a Comment