राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पास मुदतवाढ देण्याबाबत national scheme pranali
वाचा :
१) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक सेनिवे-२०२४/प्र.क्र.५४/सेवा-४, दि. २०.०९.२०२४.
२) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक सेनिवे-२०२४/प्र.क्र.५४/सेवा-४, दि. २८.०३.२०२५.
शासन निर्णय :-
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दि.३१.०३.२०२६ पर्यंत विकल्प देण्याच्या सूचना संदर्भाधीन क्र.२ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. आता सदर विकल्प सादर करण्यासाठी दि.३१.१२.२०२६ पर्यंत सुधारीत मुदतवाढ देण्यात येत आहे.
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०३३०१२१८०५३७०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,





![Release of Admit Cards for the Candidates of National Eligibility cum Entrance Test [NEET (UG)]-2026...](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/04/Screenshot_2026_0426_220205-150x150.jpg)





