STARS(Strengthening Teaching Learning and Results for States) या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी SNA-SPARSH या प्रणालीवर केंद्र शासनाने सन २०२६-२७मध्ये Mother Sanction म्हणून मंजूर केलेला केंद्र हिस्सा व त्याला समरूप राज्य हिस्सा रक्कम अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्याबाबत
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक : एसएनए-२०२६/प्र.क्र.८९ (ई-१६९८५९८)/एसडी-६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक:- २३, सप्टेंबर, २०२६
वाचा:-
(१) वित्त विभागाचे परिपत्रक क. अर्थसं २०२६/प्र.क्र.४०/अर्थ-३, दि. ०९.०४.२०२६
(२) वित्त विभागाचे परिपत्रक क. अर्थसं २०२६/प्र.क्र.४०/अर्थ-३,दि.०७.०५.२०२६
(३) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे परिपत्रक क्र. बीयुडी-२०२५/प्र.क्र.१०५ / अर्थसंकल्प, दि.१९.०५.२०२६
(४) आदिवासी विकास विभागाचे परिपत्रक क्र.बीयुडी-२०२६/प्र.क्र.६१/कार्यासन-६, ई नस्ती क्रमांक-१६५०६७२ दि.१३.०५.२०२६
(५) शासन निर्णय क्र. एसएनए-२०२६/प्र.क्र.८९/एसडी-६, दि.१० जून, २०२६
(६) केंद्र शासनाचे निधी वितरण आदेश क्र.F.N०.१६-३/२०२६-SS.१ दि.१७.०९.२०२६ सोबतचे सहपत्र (F.NO.२०२/IFD/२०२६-२७/(MH), दि.०९.०९.२०२६.
(७) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांचे पत्र क. मप्राशिप/STARS-Mother Sanction/लेखा/२०२६-२७/२७७७८, दि. १८.०९.२०२६
प्रस्तावना :-
केंद्र शासनाच्या दि.०९.०९.२०२६ रोजीच्या आदेशान्वये STARS (Strengthening Teaching Learning and Results for States) या योजनेसाठी (Mother Sanction) सन २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षातील दुसरा हप्ता सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या घटकांसाठी आवर्ती व अनावर्ती बाबींकरीता निधी मंजूर केला आहे. त्या अनुषंगाने STARS या योजनेच्या उद्दिष्ट ३१- “सहायक
शासन निर्णय क्रमांक: एसएनए-२०२६/प्र.क्र.८९ (ई-१६९८५९८१/एसडी-६
अनुदाने” (वेतनेतर) व उद्दिष्ट ३५ भांडवली मत्तेच्या निमितींकरिता अनुदान या उद्दिष्टांखाली केंद्र शासनाने सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या घटकांसाठी मंजूर केलेला हिस्सा व त्याला समरुप राज्य शासनाचा हिस्सा याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे:-
त्यानुसार सन २०२६-२७ मधील अर्थसंकल्पिय अंदाजपत्रकातील तरतूदीनुसार STAHS (Strengthening Teaching Learning and Results for States) या योजनेकरीता उद्दिष्ट ३१- “सहायक अनुदाने” (वेतनेतर) व उद्दिष्ट ३५- भांडवली मत्तेच्या निमिर्तीकरिता अनुदान या उद्दिष्टांखाली Mother Sanction म्हणून केंद्र शासनाने सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या घटकांसाठी मंजूर केलेला हिस्सा व त्याला समरुप राज्य शासनाचा हिस्सा राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक
शिक्षण परिषद, मुंबई यांना अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (BEAMS) वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
STARS (Strengthening Teaching Learning and Results for States) या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीकरिता Mother Sanction म्हणून केंद्र शासनाने उद्दिष्ट ३१- “सहायक अनुदाने” (वेतनेतर) व उद्दिष्ट ३५- भांडवली मत्तेच्या निमिर्तीकरिता अनुदान अंर्तगत उपलब्ध करुन दिलेला केंद्र हिस्सा रु. ५७,०२,५८,०००/- (अक्षरी रुपये सत्तावन्न कोटी दोन लाख अठ्ठावन्न हजार फक्त) व त्याप्रमाणात राज्य हिस्सा रु रु. ३८,०१,७२,०००/- (अक्षरी रुपये अड्नुतीस कोटी एक लाख बाहत्तर हजार फक्त) अशी एकूण रु. ९५,०४,३०,०००/- (अक्षरी रुपये पंच्याण्णव कोटी चार लाख तीस हजार फक्त) इतका निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना खालील तक्त्यामध्ये नमूद लेखाशिर्षनिहाय सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात मंजूर अर्थसंकल्पीत तरतुदीमधून वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अ) केंद्र हिस्सा:-
२. सदर निधी खर्च करताना केंद्र शासनाच्या दि.०९.०९.२०२६ रोजीच्या निधी वितरण आदेशामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करण्यात यावे. वरील तक्त्यात दर्शविण्यात आल्याप्रमाणे ज्या घटकांसाठी व ज्या बाबींसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे, त्याच मर्यादेत त्या घटकांसाठी व बाबींसाठी निधी खर्च होईल याची दक्षता नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी.
३. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी सदर तरतुद खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तिय नियम तसेच संदर्भाधीन वित्त विभागाचे परिपत्रक दि.०९.०४.२०२६ व दि.०७.०५.२०२६, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे परिपत्रक दि.१९.०५.२०२६ व आदिवासी विकास विभागाचे परिपत्रक दि.१३.०५.२०२६ अन्वये दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.
४. सदर निधी सायबर कोषागार कार्यालयामार्फत (कोषागार संकेतांक ८१०१) आहरित करण्यासाठी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” तसेच देयके आहरण व संवितरण करण्याकरिता उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना “आहरण व संवितरण अधिकारी” घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रस्तावित निधी आहरित व वितरित करताना विहित कार्यपध्दतीचे अनुपालन करावे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०९२३१४५६५१९९४९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
प्रत,
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,










