शासकीय उच्च अधिकाऱ्यांच्या दालनात वातानुकुलीत यंत्रे बसविण्याबाबत vatanukulit yantra paripatrak
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्र. शाकाजा-१०२२/प्र.क्र.१३/२२,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २५ मे, २०२२
संदर्भ :-
१) शासन परिपत्रक क्र. शाकाजा-१०९१/प्र.क्र.७२/२२, दि.६ जून, १९९१.
२) शासन निर्णय क्र. शाकाजा-१०१२/प्र.क्र.२/२०१२/२२, दि.२७ फेब्रुवारी, २०१२
प्रस्तावना:-
सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधिन क्र.१ च्या परिपत्रकाद्वारे राज्यातील जे शासकीय अधिकारी रु.१८४००/- किंवा त्यापेक्षा अधिक किमान वेतन आहे अशा वेतनश्रेणीत काम करतात त्यांची दालने वातानुकूलीत करण्यास मंजुरी देण्यात आली. तद्नंतर सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनसंरचने नुसार या विभागाच्या संदर्भाधिन क्र.२ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील जे शासकीय अधिकारी वेतन बँड रु.३७४००-६७००० ग्रेड वेतन रु.१०,०००- किंवा त्यापेक्षा अधिक वेतन बँड ग्रेड वेतनमध्ये काम करतात त्यांची दालने वातानुकूलीत करण्यास अनुज्ञयता देण्यात आली. आता ७ व्या वेतन आयोगानुसार ज्या उच्च अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी वेतन स्तर ९-३०:१४४२००-२१८२०० व त्यापेक्षा अधिक आहे अशा उच्च अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात वातानुकूलीत यंत्रे बसविण्याची सुविधा अनुज्ञेय करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती
शासन निर्णयः-
१. सातव्या वेतन आयोगानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम २०१९ नुसार राज्यातील जे शासकीय अधिकारी सुधारित वेतनश्रेणी मधील वेतन स्तर -३०: १४४२००-२१८२०० किंवा त्यापेक्षा अधिक वेतनस्तरा मध्ये काम करतात त्यांची दालने वातानुकूलीत करता येतील असा शासनाने निर्णय घेतला आहे.
२. या बाबीवर होणारा खर्च संबंधीत विभागाने त्यांच्या मंजूर अनुदानातून भागवावा.
३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाच्या अनौपाचारिक संदर्भ क्र. १६९/विनियम,
दि. ०६.५.२०२२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२२०५२५१२४५२१७१०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.











