वैयक्तिक गाऱ्हाण्यासंबंधीच्या अर्जावरील कार्यवाहीबाबत स्पष्टीकरण personal garhane aplication karyvahi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वैयक्तिक गाऱ्हाण्यासंबंधीच्या अर्जावरील कार्यवाहीबाबत स्पष्टीकरण personal garhane aplication karyvahi

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण २०१९ / प्र. क्र. ७१/१८ (र. व का.)

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : १४ ऑक्टोबर, २०१९.

परिपत्रक :

असे निदर्शनास आले आहे की, काही त्रयस्थ व्यक्ती / संस्था अन्य व्यक्तींच्या वैयक्तिक गाहाण्यासंबंधी पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा करतात. अशा पत्रांची दखल घ्यावी किंवा कसे, या बाबत अनेक विभागांकडून या विभागास विचारणा होत असते. सबब यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत स्पष्टता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

२. शासनास करावयाचे अर्ज तयार करणे, सादर करणे व त्याची विल्हेवाट लावणे याविषयीच्या दिनांक ३ डिसेंबर, १९५८ च्या अधिसूचनेन्वये, याबाबतचे नियम विहित करण्यात आले असून त्यातील अनुक्रमांक १ येथील नियमान्वये, वैयक्तिक गाहाण्यासंबंधीचे अर्ज, ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला असेल त्याच्याकडून स्वीकारण्यात यावेत. एजंटांकडून किंवा त्यांच्यामार्फत शासनास करण्यात आलेल्या अर्जाची सामान्यतः दखल घेण्यात येऊ नये, अशी तरतूद करण्यात आलेली आहे.

३. सबब सर्व मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रिय कार्यालयांना सूचित करण्यात येते की, त्रयस्थ व्यक्ती / संस्था यांचेकडून अन्य व्यक्तींच्या वैयक्तिक गाहाण्यासंबंधी पत्रव्यवहार किंवा पाठपुरावा करण्यात आल्यास उक्त नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी.

४. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०१९१०१५१५२९०८२९०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Related posts:

Leave a Comment