स्वातंत्र्य दिन सोहळा २०२६ दरम्यान My Gov आणि MY Bharat पोर्टलवर आयोजित केल्या जाणा-या, विविध स्पर्धा / उपक्रमांचे प्रचार व प्रसाराबाबत Independence day my gov my bharat portal
संदर्भ :- केंद्र शासन पत्र क्रमांक एफ. एनओ.१७-१९/२०२६, सीओओआरडी दि.०४/०६/२०२६
उपरोक्त संदर्भीय केंद्र शासनाच्या पत्रानुसार आपणांस कळविण्यात येते की, केंद्रशासनाच्या पत्रात नमूद संरक्षण मंत्रालय MyGov आणि MyBharat यांच्या संयुक्त विद्यमाने परिशिष्ट अ नुसार आगामी स्वातंत्र्य दिन सोहळा-२०२६ पासून विविध ऑनलाईन स्पर्धा/उपक्रमांचे आयोजन करत आहे. उपरोक्त स्पर्धा/उपक्रमांची प्रमुख वैशिष्टये आणि नियम व अटी देखील सोबत जोडल्या आहेत. या स्पर्धा/उपक्रमांची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये प्रसारित करण्यासाठी व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी. जेणेकरून जास्तीत जास्त सहभागास प्रोत्साहन मिळेल आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढेल, असे संचालनालयास सूचित केलेले आहे. (सोबत संदर्भीय केंद्र शासनाच्या पत्राची प्रत जोडली आहे.)
खाली नमूद प्रमाणे विविध स्पर्धा उपक्रम व त्यांचे विषयः-
निबंध स्पर्धा दिनांक ०१.०६.२०२६ ते १५.०७.२०२६ या कालावधीत २०४७ पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत ए आय ची भूमिका या विषयावर आयोजित केलेली आहे.
ठळक वैशिष्ट्ये: त्याचे सार दर्शवणारा ५००-६०० शब्दांतील निबंध लिहावा. अंतिम यादीतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी १५,००० रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.
सर्वोत्कृष्ट २०० सहभागीना (त्यांच्यासोबत एक वडील/आई/पालक) दिनांक १५.०८.२०२६ रोजी नवो दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणा-या स्वातंत्र्यदिन सोहळयाचे साक्षीदार होण्यासाठी ई-निमंत्रण पाठवले जाईल.
*चित्रकला स्पर्धा दिनांक ०१.०६.२०२६ ते १५.०७.२०२६ या कालावधीत भारतः १९४७ ते भारतः २०४७ या विषयावर आयोजित केलेली आहे.
ठळक वैशिष्ट्ये: अंतिम यादीतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी १५,००० रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. प्रत्येकी ५००० रुपयांची २० उत्तेजनार्थ बक्षिसे.
सर्वोत्कृष्ट २०० सहभागींना (त्यांच्यासोबत एक वडील/आई/पालक) दिनांक १५.०८.२०२६ रोजी नम्रो दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणा-या स्वातंत्र्यदिन सोहळयाचे साक्षीदार होण्यासाठी ई-निमंत्रण पाठवले जाईल.
* ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा दिनांक ०१.०६.२०२६ ते १५.०७.२०२६ या कालावधीत
१. भारतीय संविधान- मूलभूत हक्क, कर्तव्य, प्रमुख कलमे आणि रचनाकार
२. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महिलांची भूमिका राणी लक्ष्मीबाईपासून सरोजिनी नायडूंपर्यंत आणि त्यापुढील.
३. आधुनिक भारताचे प्रमुख टप्पेः अंतराळ तंत्रज्ञानातील प्रगती आणि यश.
४. नाभिकीय तंत्रज्ञानात भारताची यश कथा अणुतंत्रज्ञानातील भारताची यशोगाथा.
या विषयावर आयोजित केलेली आहे.
ठळक वैशिष्ट्ये: ५ मिनिटांची व्दिभाषिक (हिंदी आणि इंग्रजी) प्रश्नमंजुषा, ज्यामध्ये जास्तीत जास्त २०
प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. सर्व प्रश्नमंजुषांमधील एकत्रित कामगिरीच्या आधारावर विजेत्यांची घोषणा केली जाईल. सर्व सहभागींना ई-सहभाग प्रमाणपत्र मिळेल. अंतिम यादीतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी १५,००० रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. प्रत्येकी ५००० रुपयांची ५० उत्तेजनार्थ बक्षिसे. सर्वोत्कृष्ट २०० सहभागींना (त्यांच्यासोबत एक वडील/आई/पालक) दिनांक १५.०८.२०२६ रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणा-या स्वातंत्र्यदिन सोहळयाचे साक्षीदार होण्यासाठी ई-निमंत्रण पाठवले जाईल.
त्यानुसार आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या संदर्भीय केंद्र शासनाच्या पत्रातील सूचना निदर्शनास आणून संरक्षण मंत्रालय MyGov आणि MyBharat यांच्या संयुक्त विद्यमाने परिशिष्ट अ नुसार आगामी स्वातंत्र्य दिन सोहळा २०२६ पासून विविध ऑनलाईन स्पर्धा/उपक्रमांचे आयोजन करणेबाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांस सदरील बाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.












