राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांच्या सेवा समायोजनाबाबत kantrati karmachari samayojan
संदर्भ: शासनपत्र समक्रमांक दिनांक २४.०२.२०२६
18.1K
महोदया,
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांनी त्यांची कंत्राटी सेवा निमित करण्याबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर येथे विविध रिट याचिका दाखल केलेल्या आहेत., सदर याचिकेमध्ये मा. उच्च न्यायायालने सुनावणी घेत याचिकार्ता यांनी सादर केलेल्या निवेदनावर महिन्यांच्या आत निर्णय घेण्याबाबत आदेश पारित करीत याचिका निकाली काढलेल्या आहेत.
त्यानुषंगाने संदर्भाधिन पत्रान्वये मा. उच्च न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाच्या अनु’ गान याचिककार्ता यांची माहिती शासनास तात्काळ सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. सदर माहिती अद्याप अप्राप्त आहे. प्रस्तुत न्यायालीन प्रकरणाचे महत्व विचारात घेता, संदर्भाधिन पत्रान्वये मागविण्या आलेले माहिती शासनास त्वरेने सादर करावी, ही विनंती.










