“बालपन कि कविता” संग्रहासाठी विविध प्रकारची गीते सादर करणेबाबत balpan ki kavita sangraha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“बालपन कि कविता” संग्रहासाठी विविध प्रकारची गीते सादर करणेबाबत balpan ki kavita sangraha 

संदर्भ- स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शास्त्री भवन, नवी दिल्ली, शिक्षा मंत्रालय भारत सरकार कार्यालयाचे पत्र, D.O No.- १-१/२०२५-७ १३, दि.२७.०३.२०२६

उपरोक्त विषयान्वये, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP), २०२० नुसार शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने (DOSE & L) “बालपण कि कविता” उपक्रमांतर्गत लहान मुलांची कविता व गाणी पुनसंग्रहित करणेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे. प्रस्तुत उपक्रमाचा उद्देश पायाभूत टप्प्यातील शिक्षणासाठी भारतीय कवितांचा संग्रह तयार करणे असा आहे. प्रस्तुत उद्दिष्ट पूर्तता करण्यासाठी देशभरातील साधारण २२ प्रमुख भाषांमध्ये तयार असणारे लोकसाहित्य, विविध स्तरासाठीचे (वयोगटानुसार) तयार केलेल्या बालसाहित्यातील स्वलिखित कविता, गीते सादर करणे तसेच जुन्या कविता व गीते संबंधित लेखकांच्या नावासह एकत्रित करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. कविता व गाणी पुढील पाच स्तरांसाठी संकलित करावयाच्या आहेत.

१. बालवाटिका (वय वर्ष ३-४)

२. बालवाटिका (वय वर्ष ४-५)

३. बालवाटिका (वय वर्ष ५-६)

४. इयत्ता १ ली (वय वर्ष ६-७)

५. इयत्ता २ री (वय वर्ष ७-८)

सदर उपक्रमात सहभाग घेण्यासाठी-

a. कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

b. बालगीत किंवा कविता ४ ते १२ ओळींची असावी.

c. कविता पाठविण्यासाठी https://tinyurl.com/Balpan KiKavita२६२७ या लिंकचा वापर करावा.

d. राज्यावर संकलित होणाऱ्या ज्या कविता शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत निवडल्या जातील त्या निवडक प्रवेशिकांना प्रमाणपत्रे आणि रोख बक्षिसे दिली जातील; तसेच त्यांचा समावेश एका बहुभाषिक मल्टीमीडिया संग्रहात (मुद्रित, डिजिटल, ऑडिओ-व्हिज्युअल) केला

जाणार आहे, जो NCERT, KVS, CBSE आणि SCERTS सह राष्ट्रीय शैक्षणिक प्लॅटफॉर्मवर एकत्रित केला जाणार आहे.

e. सदर कविता दिनांक २५ एप्रिल २०२६ पर्यंत SCERT च्या उपरोक्त लिंकवर पाठविण्यात याव्यात.

f. सदर उपक्रमातील सहभाग सर्वांसाठी खुला आहे.

सदर कविता संग्रहासाठी महाराष्ट्राची प्रमुख भाषा मराठी सोबतच इंग्रजी व इतर भाषांमध्ये देखील कविता व गाणी सादर करता येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, कवी, लेखक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस यांच्यापर्यंत सदर उपक्रमाच्या माहितीचा व्यापक प्रसार आणि प्रचार Whatsapp सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, वृत्तपत्रांद्वारे करण्यात यावा. प्रत्येक शाळेतून उपरोक्त प्रत्त्येक गटासाठी शक्य होतील तेवढ्या स्वलिखित कविता, गाणी तसेच लोकसाहित्यात लोकप्रिय असलेल्या विद्यमान कविता (लेखकाच्या नावासह) सादर करण्यासाठी आवाहन करावे.

सदर आदेशानुसार आपल्या स्तरावरून तत्काळ कार्यवाही पूर्ण करण्यात यावी व कार्यवाहीचा अहवाल प्रस्तुत कार्यालयास सादर करण्यात यावा.

Related posts:

Leave a Comment