दि.०१ मे, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिवस साजरा करण्याबाबत maharashtra din celebration
संदर्भ :
– १) गृह विभाग, भारत सरकार यांचे दि. २८ जानेवारी २०२६ रोजीचे पत्र.
२) या कार्यालयाचे समक्रमांकित दि. २३ एप्रिल २०२६ रोजीचे परिपत्रक.
महोदय / महोदया,
शुक्रवार, दिनांक १ मे, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचा ६७ व्या स्थापना दिन राज्यभर साजरा करण्यात येणार आहे. यानुषंगाने दि.२३ एप्रिल २०२६ रोजी परिपत्रकान्वये राज्यभर महाराष्ट्र स्थापना दिन साजरा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. उपरोक्त संदर्भाधिन क्र.१ येथील दि.२८ जानेवारी २०२६ रोजीच्या पत्रान्वये राष्ट्र गीत (वंदे मातरम्) वाजविण्याबाबत निदेश दिले आहेत. यानुषंगाने संदर्भाधिन क्र. २ येथील पत्रान्वये दिनांक १ मे, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय गीत (वंदे मातरम्) वाजविण्याबाबत कळविण्यात आले आहे. तथापि, राष्ट्रीय गीत (वंदे मातरम्) नेमका केव्हा केव्हा वाजवायाच्या आहेत याबद्दल विचारणा करण्यात येत आहे. सबब, दिनांक १ मे, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन कार्यक्रमामध्ये पुढील कार्यवाही करण्यात यावी.
१) ज्या ठिकाणी ध्वजवंदन कार्यक्रमासह इतर कार्यक्रम आयोजित केले आहे त्यांनी पुढील कार्यवाही करावी.
(1) कार्यक्रम सुरू झाल्यावर
अ) सावधान स्थितीत येऊन राष्ट्रीय गीत (वंदे मातरम्) वाजविण्यात यावे / गायन करावे.
आ) राष्ट्रीय गीत (वंदे मातरम्) झाल्यानंतर राष्ट्रध्वजवंदन करणे.
इ) राष्ट्रध्वजाला सलामी व राष्ट्रगीत
ई) राज्यगीत
(II) कार्यक्रम समाप्तीवेळी
अ) सावधान स्थितीत येऊन राष्ट्रीय गीत (वंदे मातरम्) वाजविण्यात यावे / गायन करावे.
आ) राष्ट्रगीत वाजविण्यात यावे.
२) ज्या ठिकाणी फक्त ध्वजवंदन कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांनी पुढील कार्यवाही करावी.
अ) सावधान स्थितीत येऊन राष्ट्रीय गीत (वंदे मातरम्) वाजविण्यात यावे / गायन करावे.
आ) राष्ट्रीय गीत (वंदे मातरम्) झाल्यानंतर राष्ट्रध्वजवंदन करणे.
इ) राष्ट्रध्वजाला सलामी व राष्ट्रगीत
ई) राज्यगीत
सदर सूचना फक्त दिनांक १ मे, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन कार्यक्रमाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत असून कृपया त्याप्रमाणे कार्यवाही करावी, ही विनंती.






![Release of Admit Cards for the Candidates of National Eligibility cum Entrance Test [NEET (UG)]-2026...](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/04/Screenshot_2026_0426_220205-150x150.jpg)


