राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी “आदर्श शाळा” या योजनेअंतर्गत विविध अर्थसंकल्पीय लेखाशीर्षांचे एकत्रिकरण करण्याबाबत ideal school yojana paripatrak
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक : आदर्श-२०२६/प्र.क्र.१३१(ई-१८३६८८५)/एसडी-६
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक :- ०७ ऑक्टोबर, २०२६
(१) नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.४७/का.१४११. दिनांक ०३ ऑगस्ट, २०२६
(२) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२५/प्र.क्र.२/अर्थसंकल्प-२, दि ०३ सप्टेंबर, २०२६
(३) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. प्राशिस / आ.शा/अंदाज-२०२/२०२६-२७/२०९७७३९, दिनांक २४.०८.२०२६.
(४) कार्यासन अधिकारी, कार्या. अर्थसंकल्प यांचे पत्र क्र. संकीर्ण-२४२६/प्र.क्र.५८/अर्थसंकल्प, दिनांक ३०.०९.२०२६..
प्रस्तावना :-
राज्यातील लोकाभिमुख सेवा व कल्याणकारी योजनांचे सुलभीकरण व शासकीय प्रक्रिया पुनर्रचाना (GPR) करण्यासाठी नियोजन विभागाच्या संदर्भ क्र.१ च्या दि.०३.०८.२०२६ शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी “आदर्श शाळा” या सर्वसमावेशक योजनेअंतर्गत विविध लेखाशीर्षांचे एकत्रिकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी “आदर्श शाळा” या सर्वसमावेशक योजनेअंतर्गत मागणी क्र. ई-२ खालील लेखाशिर्षांचे पुढीलप्रमाणे एकत्रिकरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे :
२. सन २०२७-२८ करिता अर्थसंकल्पीय अंदाज तयार करताना उपरोक्तप्रमाणे एकत्रित केलेले लेखाशीर्ष विचारात घेण्यात यावे. तसेच सन २०२७-२८ या आर्थिक वर्षापासून उपरोक्त योजनांसाठी नव्याने तयार करण्यात येणाऱ्या लेखाशीर्षाखाली एकत्रित तरतूद करण्यात यावी. उपरोक्त दोन लेखाशीर्षांमध्ये यापुढे निधी अर्थसंकल्पित, मंजूर व वितरित करण्यात येईल.
३. उपरोक्त संदर्भ क्र.०१ येथील शासन निर्णयान्वये मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (GPR) समितीने दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
शासन निर्णय क्रमांक: आदर्श-२०२६/प्र.क्र.१३१(ई-१८३६८८५/एसडी-६
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६१००७१२२२२९१२४९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,









