जिल्हांतर्गत बदली पोर्टलवर Vaccancy Report Update करणे बाबत online teacher transfer portal
संदर्भ :- जिल्हांतर्गत बदली पोर्टलवरील दि.०७/०७/२०२५ रोजीचे वेळापत्रक.
उपरोक्त संदर्भीय विषयी कळविण्यात येते की, यापुर्वी जिल्हांतर्गत बदली पोर्टलवर संचमान्यता २०२४-२५ नुसार मान्य पदे, कार्यरत व रिक्त पदे भरण्यात आलेली होती. त्यावेळी दि.३०/०६/२०२५ रोजी सेवानिवृत्त होणा-या शिक्षकांना बदली पोर्टलवर Current Working Post मधून वगळण्यात आले होते. त्यामुळे दि.३०/०६/२०२५ रोजी रिक्त होणारी पदे बदली पोर्टलवर Automatically रिक्त दर्शविली गेली होती. त्यानुसार आपण आपल्या तालुक्याच्या Offline Excel Sheet मध्ये आवश्यक तो बदल करुन बदली पोर्टलवर मान्य पदे, कार्यरत व रिक्त पदे भरण्यात आलेली होती.
आज दि.०७/०७/२०२५ रोजी जिल्हांतर्गत बदली पोर्टलयर Vaccancy Report Update करण्यासाठी दि.०७/०७/२०२५ ते दि.०८/०७/२०२५ या कालावधीचा वेळ दिलेला आहे. त्यानुसार पुर्वी भरलेल्या Vaccancy नुसार आज Excel Sheet Download फैली असता त्यामध्ये दि. ३०/०६/२०२५ रोजी सेवानिवृत्त झालेले शिक्षक Current Working Post मध्ये कार्यरत दर्शविले आहे. त्यामुळे दि.३०/०६/२०२५ रोजीची रिक्त दिसत असलेली पदे आज ० (शुन्य) दिसत आहेत.
त्यामुळे आता दि.३०/०६/२०२५ रोजीची सेवानिवृत्त झालेली पदे बदली पोर्टलवर Current Working Post मध्ये Add झाल्याप्रमाणे आपल्याही Offline Excel Sheet मध्ये तसा बदल करून बदली पोर्टलवर Vaccancy Report Update करावयाचा आहे. थोडक्यात बदली पोर्टलवर दि.३१/०५/२०२५ रोजी कार्यरत शिक्षकांची स्थिती Update करावयाची आहे. त्यात फार मोठा बदल होणार नसून फक्त दि.३०/०६/२०२५ रोजी सेवानिवृत्त झालेली पदे बदली पोर्टलने Current Working Post मध्ये घेतल्याप्रमाणे बदल केल्यास रिक्त पद Automatically (शुन्य) येतील. मान्य पदामध्ये कसलाही बदल होणार नाही.
तरी आपल्या लॉगीनवरुन बदली पोर्टलवर एकाही पदाच्या रिक्त पदाचे समानिकरण न करता संचमान्यता २०२४-२५ नुसार मान्य पदे व दि.३१/०५/२०२५ रोजीची कार्यरत पदे माध्यमनिहाय जिल्हांतर्गत बदली पोर्टलवर आजच नोंदवण्यात यावे. माध्यमनिहाय Offlin excel Sheet तसेच Online मधील updated Excel Sheet शी जुळवून दोन्ही माध्यमाच्या एकत्रित Online व Offline Excel Sheet च्या Soft य Hard कॉपी स्वाक्षरीच्या २ प्रतीसह उद्या दि.०८/०७/२०२५ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता शिक्षण विभाग (प्राथ.) येथे बदली पोर्टलवर Vaccancy Report Update चे काम केलेल्या कर्मचा-यास उपस्थित राहण्यास सुचित करावे. येथे सर्व Soft व हार्ड कॉपी पोर्टलमधील आकडेवारीसह जुळल्यानंतरच Send To EO करायचे आहे. तपासून Send To EO केल्यानंतर EO लॉगीनवरील एकत्रित करण्याचे काम व त्यानंतर Send To CEO प्रक्रियेसाठी लागणार वेळ लक्षात घेता आपल्या कर्मचा-यांना वेळेवर उपस्थित राहण्याबाबत सुचना देण्यात याव्यात.










