दीक्षा पोर्टलवरील “शिक्षकांसाठी AI साथी” या ऑनलाईन कोर्सला पुन्हा मुदतवाढ देणेबाबत diksha portal ai sathi course paripatrak
संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र क्र. IT/BROADCAST MEDIA 1/2022467/2026, दि. १५/०७/२०२६.
२. CIET-NCERT यांचे पत्र, दि. ०६/०७/२०२६.
३. या कार्यालयाचे पत्र. क्र. SCERT-28.0/32/2025-IT/BROADCAST MEDIA I/2113356/2026 दि.
०२/०९/२०२६.
उपरोक्त संदर्भ क्र. १ नुसार राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी “शिक्षकांसाठी AI साथी” हा ऑनलाईन कोर्स दीक्षा (DIKSHA) पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर कोर्स साठी संदर्भक्रमांक ३ नुसार प्रथम मुदतवाढ देण्यात आली होते. संदर्भ क्र. २ मधील निर्देशानुसार, सदर कोर्सच्या कालावधीस द्वितीय मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहील :
कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी अंतिम दिनांक
कोर्स पूर्ण करण्यासाठी अंतिम दिनांक
३१ ऑक्टोबर २०२६
३० नोव्हेंबर २०२६
त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत अध्यापन करणाऱ्या ज्या शिक्षकांनी अद्याप सदर कोर्समध्ये प्रवेश घेतलेला नाही, त्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कोर्समध्ये प्रवेश घ्यावा आणि ज्या शिक्षकांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांनी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत कोर्स पूर्ण करावा, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.










