दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन व अंशकालीन निदेशकांचे मानधन अदा करण्याबाबत karmachari vetan mandhan circular
संदर्भ:- संचालनालयाचे ज्ञापन दिनांक २१.१०.२०२६,२३.१०.२०२६,२६.१०.२०२६ व २७.१०.२०२६
उपरोक्त विषयानुसार संचालनालयाच्या संदर्भीय ज्ञापनान्वये आपणास लेखाशिर्ष २२०२०१७३-३६/०४/१०, २२०२००४८-३६.२२०२०१८२-३६. २२०२०२०८-३६/०४/१०, २२०२३२६१-३६. २२३५२९७६, २२०२आय८७१, २२०२आय८७१ अंतर्गत नियमित वेतन, निवृत्तिवेतन व कंत्राटी शिक्षकांचे मानधन, अंशकालीन निदेशकांचे मानधन या बाबींसाठी आवश्यक तरतुदी वितरित करण्यात आलेल्या आहेत.
दिवाळीपूर्वी कर्मचान्यांचे वेतन अदा न झाल्यास याबाबत तक्रारी प्राप्त होण्याची तसेच विधिमंडळात तारांकित व अतारांकित प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असते. तसेच, कर्मचारी संघटनांकडूनही यासंदर्भात तक्रारी व निवेदने सादर केली जातात. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर अनावश्यक अडचणी निर्माण होऊन विभागाची प्रतिमा प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी उपरोक्त बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या स्तरावर वितरित करण्यात आलेल्या तरतुदींचा विनियोग करून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन व अंशकालीन निदेशकांचे मानधन दिवाळीपूर्वी अदा होईल, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी. कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन अथवा मानधन प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
सदर कार्यवाहीस सर्वोच्च प्राधान्य देण्यात याये.










