सहायक पदे उसनवारी तत्वावर भरण्याबाबत sahayyk post circular
विषय सहायक पदे उसनवारी तत्वावर भरण्याबाबत
संदर्भ :-१) शासन निर्णय क्रमांक डायट-४५१६/(४०/१६) प्रशिक्षण, दिनांक १७ ऑक्टोबर २०१६
२) शासनाचे पत्र क्र. ६६७४३२, दिनांक ०५/१०/२०२६.
३) मा. संचालक यांच्या दि.२६/१०/२०२६ रोजीची मान्य टिप्पणी
वरील विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, “विषय सहायक” पदे उसनवारी तत्वावर भरण्याबाबतची लिंक या कार्यालयाचे www.maa.ac.in या वेबसाईटवर “विषय सहायक निवड प्रक्रिया या टॅबवर दिनांक २८.१०.२०२६ रोजी सकाळी १०.०० पासून दिनांक १५.११.२०२६ रोजी सायंकाळी ५.०० पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
तरी, सदर विषयाच्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त सर्व मुख्याध्यापक/प्राचार्य, शासकीय, स्थानिक स्वराज्य शाळा व अध्यापक विद्यालयातील नियमित शिक्षकांना सदर लिंक www.maa.ac.in या वेबसाईटवर प्रसिध्द केली असल्याबाबत कळविण्यात यावे.











