विकसित महाराष्ट्र – २०४७ ई-लर्निंग मॉड्यूल” हा कोर्स विहित वेळेत पूर्ण करण्याबाबत e-learning module course circular
संदर्भ :- शासन पत्र क्र.ई-१०८४१०६/२०२५/प्रशिक्षण दि. १३.१०.२०२६
उपरोक्त विषयाबाबत वरील संदर्भीय शासन पत्राचे कृपया अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न)
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की नियोजन विभागामार्फत कर्मयोगी भारत (IGOT Karmayogi) या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विकसित महाराष्ट्र ई-लर्निंग मॉड्यूल (Viksit Maharashtra-२०४७ E-Learning Module) हा महत्त्वपूर्ण कोर्स सुरु करण्यात आलेला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील आणि त्याअंतर्गत येणा-या सर्व कार्यालयांमधील संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी हा कोर्स दि. ३० नोव्हेंबर, २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
या संदर्भात विभागातील तसेच अधिनस्त कार्यालयातील अधिका-यांनी आपल्या स्तरावरुन याविषयी तात्काळ आढवा घेऊन आपल्या अधिपत्याखालील अधिकारी/कर्मचा-यांना हा कोर्स विहीत मुदतीत पूर्ण करण्याचे तातडीने निर्देश देण्यात यावेत.











