प्रसिद्धिपत्रक महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ maharashtra gat k service sanyukta priexam 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रसिद्धिपत्रक महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ maharashtra gat k service sanyukta priexam

विषय :- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६

शासन परिपत्रक pdf download 

आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधून एकूण २६१९ रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक २५ जून, २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच आयोगास अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त झालेल्या ३०८८ पदांचा दिनांक २२ जुलै, २०२६ च्या शुद्धिपत्रकान्वये उपरोक्त परीक्षेमध्ये समावेश करण्यात आला असून त्यानुसार एकूण भरावयाच्या पदांची संख्या ५७०७ इतकी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

२. राज्यातील भरतीप्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्च स्तरीय समितीने अंतरिम अहवाल सादर केला असून त्यामध्ये महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ परीक्षेसंदर्भात शिफारसी केल्या आहेत.

३. तद्अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरण्यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

४. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-२०२६/प्र.क्र.६४/सेवा-१ (का.१२), दिनांक ०५ नोव्हेंबर, २०२६ अन्वये शासन सेवेतील प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली असून त्यानुसार प्रस्तुत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ या परीक्षेकरीताही पात्र उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे.

५. वरीलप्रमाणे महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील विद्यमान तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गाकरीता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार असून आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक १५ नॉव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केलेला अभ्यासक्रमच सदर परीक्षेसाठी लागू राहणार आहे. सदर परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीने घेण्यात येणार आहे.

६. सामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या गट-क सेवेतील प्रशासकीय संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता विहित करण्यात आलेल्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार संयुक्त मुख्य परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.

७. विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या तसेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून संबंधीत संवर्गाच्या मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम प्राथम्यक्रमाने तयार करुन आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

८. वरीलप्रमाणे वाढीव पदसंख्येच्या अनुषंगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ करीता नव्याने अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. तसेच सदर परीक्षेसाठी यापूर्वी अर्ज सादर केलेले व शैक्षणिक अर्हतेनुसार एकापेक्षा जास्त संवर्गाकरीता देखिल पात्र आहेत अशा उमेदवारांना विकल्प सादर करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे मात्र त्याकरीता नव्याने अर्ज करावा लागणार नाही. नव्याने अर्ज/विकल्प सादर करण्यासाठी दिनांक १३ ते २७ नोव्हेंबर, २०२६ या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

९. पदसंख्येत झालेली लक्षणीय वाढ आणि त्यानुसार नव्याने समाविष्ट होणाऱ्या संवर्गाकरीता उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यासाठी तसेच ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज सादर केला आहे आणि नव्याने समाविष्ट होणाऱ्या संवर्गानुसार विहित अर्हतेनुसार पात्र ठरतात अशा उमेदवारांकडून विकल्प घेण्यासाठी मुदत देणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा सर्वकष विचार करुन महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ दिनांक ०३ जानेवारी, २०२७ ऐवजी दिनांक २४ जानेवारी, २०२७ रोजी घेण्यात येणार आहे.

१०. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२६ च्या पदवाढीसंदर्भातील आणि परीक्षायोजनेसंदर्भातील शुद्धिपत्रके आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून उमदेवारांनी कृपया त्याचे अवलोकन करावे.

Related posts:

Leave a Comment