केंद्रप्रमुख पायाभूत प्रशिक्षण प्रशिक्षण गरजांचा अभ्यास (TNA) बाबत kendrapramukha training circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रप्रमुख पायाभूत प्रशिक्षण प्रशिक्षण गरजांचा अभ्यास (TNA) बाबत kendrapramukha training circular

संदर्भ :-

१. या कार्यालयाचे पत्र जा.क्र/मिपा/प्रशिक्षण/२०२६-२७/६९९ दि.११/०८/२०२६.

२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र./मिपा/लेखा/२०२६-२७/८०७ दि.१०/०९/२०२६.

३. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या दि.०५/११/२०२६ बैठकीतील निर्देश.

उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्रात नवनियुक्त केंद्रप्रमुखांना त्यांच्या पदाच्या जबाबदाऱ्यांची माहिती देणे, प्रशासकीय कौशल्ये, शैक्षणिक नेतृत्व व तांत्रिक कौशल्ये याबाबत माहिती देणे यासाठी राज्यस्तरीय नवनियुक्त केंद्रप्रमुख पायाभूत प्रशिक्षण आयोजन करणे तसेच प्रशिक्षणासाठीचे मोड्यूल तयार करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरुन सूचना प्राप्त आहेत.

केंद्रप्रमुख यांची भूमिका व जबाबदारी सक्षमणे पार पाडण्यासाठी कोण-कोणत्या प्रशिक्षण घटकांची आवश्यकता आहे यासाठी प्रशिक्षण गरजांचा अभ्यास (TNA) करणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता, प्रशासन अधिकारी, शिक्षण निरिक्षक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व सदस्य यांना खालील लिंक दि.१५/११/२०२६ पर्यंत भरण्याबाबत आपल्या स्तरावरुन आदेशित करण्यात यावे.

गुगल फॉर्म लिंक – https://forms.gle/2Bfsn6vBNaXNxvDB8

Related posts:

Leave a Comment