शालार्थ प्रणालीमध्ये पद निर्माण, नियुक्ती दिनांक बदल आणि आधार बेस माहिती (नाव, जेंडर आणि जन्मदिनांक) इ. प्रस्ताव सादर करावयाच्या कार्यपध्दतीबाबत shalartha pranali circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालार्थ प्रणालीमध्ये पद निर्माण, नियुक्ती दिनांक बदल आणि आधार बेस माहिती (नाव, जेंडर आणि जन्मदिनांक) इ. प्रस्ताव सादर करावयाच्या कार्यपध्दतीबाबत shalartha pranali circular 

संदर्भ :- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक शालार्थ ११९८/प्र.क्र.३०/१८/टिएनटी-३ दिनांक २०/०३/२०१९

Pdf download

२) मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र.२०३१ दिनांक २९/०३/२०१९

३) मा.शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र.१८७७८५५ दिनांक ०४/०५/२०२६

उपरोक्त विषयान्वये आपणांस कळविण्यात येते की, पुणे विभागातील खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित प्राथमिक/माध्यमक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे शालार्थ ऑनलाईन प्रणालीमध्ये पद निर्माण, नियुक्ती दिनांक बदल आणि आधार बेस माहिती (नाव, जेंडर आणि जन्मदिनांक) इ. प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त होत असतात.

अधीक्षक (माध्यमिक/प्राथमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, पुणे/अहिल्यानगर/सोलापूर यांचे स्वाक्षरीने शिफारस न करता सदरचे प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त होत असल्याचे निर्दशनास आलेले आहे. तरी याबाबत सुचित करण्यात येते की, खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे शालार्थ ऑनलाईन प्रणालीमध्ये पद निर्माण, नियुक्ती दिनांक बदल आणि आधार बेस माहिती (नाव, जेंडर आणि जन्मदिनांक) इ. प्रस्ताव सादर करीत असताना पुढील प्रमाणे नमूद केलेल्या कागदपत्रांसह आणि स्वयंस्पष्ट शिफारशीसह प्रस्ताव सादर करणे अनिवार्य राहील.

> शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पोस्ट क्रिएट करणे.

१) खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे शालार्थ प्रणालीमध्ये पोस्ट क्रिएट करणेबाबतचा प्रस्ताव संबंधित मुख्याध्यापकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, पुणे/अहिल्यानगर/सोलापूर यांचेकडे विहित नमुन्यातील प्रपत्र अ मध्ये सर्व माहिती समाविष्ट करुन प्रस्ताव सादर करावा.

२) सदर प्रस्तावाची ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये अधीक्षक (माध्यमिक/प्राथमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, पुणे/अहिल्यानगर/सोलापूर यांनी आवश्यक कागदपत्रांची आणि शालार्थ ऑनलाईन प्रणालीमध्ये पोस्ट मॅपिंग मधील पदांची पडताळणी करुन पद निर्माण करणे आवश्यक असल्यास सदरचा प्रस्ताव शालार्थ २.० प्रणालीमार्फत सादर करावा. तसेच

विहित नमुन्यातील प्रपत्र अ वर शिक्षणाधिकारी आणि अधीक्षक (माध्यमिक/प्राथमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, पुणे/अहिल्यानगर/सोलापूर यांच्या प्रतिस्वाक्षरीसह शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, पुणे/अहिल्यानगर/सोलापूर यांच्या स्वयंस्पष्ट शिफारशीसह पीडीएफ स्वरुपात dydpune.egov@gmail.com या ई-मेल आयडीवर प्राधिकृत ई-मेल आयडीवरुन या कार्यालयास सादर करण्यात यावेत. तसेच सदरचा प्रस्ताव समक्ष प्रस्तुत कार्यालयाच्या संबंधित कार्यासनास मूळ प्रतीत सादर करावा व सोबत आवश्यक कागदपत्रांची पीडीएफ 512kb पर्यंत पेनड्राईव्ह मध्ये समाविष्ट करुन सादर करावयाची दक्षता घ्यावी.

३) सदरचे प्रस्ताव संबंधित कर्मचारी तसेच संबंधित शाळेच्या अन्य कोणत्याही कर्मचा-यामार्फत या कार्यालयास सादर होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

> शालार्थ प्रणालीमध्ये नियुक्ती दिनांकात व आधार बेस माहिती (नाव, जेंडर, जन्मदिनांक) बदल करणेबाबत.

१) खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या शालार्थ प्रणालीमध्ये जन्मदिनांकात बदल करणेबाबतचा प्रस्ताव संबंधित मुख्याध्यापकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, पुणे/अहिल्यानगर/सोलापूर यांचेकडे सादर करावा.

४) सदर प्रस्तावाची शालार्थ ऑनलाईन प्रणालीमध्ये अधीक्षक (माध्यमिक/प्राथमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, पुणे/अहिल्यानगर/सोलापूर यांनी खातरजमा करुन शालार्थ २.० प्रणालीमार्फत या कार्यालयास सादर करावा. तसेच पीडीएफ स्वरुपात सदरचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, पुणे/अहिल्यानगर/सोलापूर यांनी आपल्या स्वयंस्पष्ट शिफारशीसह dydpune.egov@gmail.com या ई-मेल आयडीवर प्राधिकृत ई-मेल आयडीवरुन सादर करावा. तसेच सदरचा प्रस्ताव समक्ष प्रस्तुत कार्यालयाच्या संबंधित कार्यासनास मूळ प्रतीत सादर करावा व सोबत आवश्यक कागदपत्रांची पीडीएफ 512kb पर्यंत पेनड्राईव्ह मध्ये समाविष्ट करुन सादर करावयाची दक्षता घ्यावी.

२) सदरचे प्रस्ताव संबंधित कर्मचारी तसेच संबंधित शाळेच्या अन्य कोणत्याही कर्मचा-यामार्फत या कार्यालयास सादर होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

सोबतः- प्रपत्र अ

Related posts:

Leave a Comment