सन २०२६-२७ च्या संच मान्यतेचे क्षेत्रीय स्तरावरील प्रलंबित कामकाज दि.३०/११/२०२६ पर्यंत पूर्ण करण्याबाबत sanchamanyata circular
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, सन २०२६-२७ ची संच मान्यता प्रणालीवर कार्यान्वित (Run) केली असता असे निदर्शनास आले आहे की, क्षेत्रीय स्तरावर अद्यापही बऱ्याच शाळांच्या बाबतीत Division Aid, Student Forward आणि Working Post यासंबंधीचा डेटा Final करणे बाकी आहे. सदर तांत्रिक बाबी प्रलंबित राहिल्यामुळे संबंधित शाळांची संच मान्यता अद्याप अंतिम होऊ शकलेली नाही.
सन २०२६-२७ च्या अंतिम संच मान्यतेनुसारच शिक्षकांचे वेतन आहरित केले जाणार आहे त्यामुळे शिक्षकांचे वेतन वेळेवर अदा होण्यासाठी संच मान्यता वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.
सबब, आपल्या अधिनस्त सर्व शाळा व गटस्तरावरील उपरोक्त प्रलंबित कामकाज दि. ३०/११/२०२६ पर्यंत पूर्ण करून डेटा अंतिम करण्यात यावा. विहित मुदतीत कामकाज पूर्ण न झाल्यामुळे संच मान्यता प्रलंबित राहून शिक्षकांचे वेतन थकल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात येईल, याची नोंद यावी.










