राज्यातील शाळांची फेरपटपडताळणी व तपासणी करणेबाबत school patpadtalani circular
संदर्भः-१. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासनपत्र क्रमांका लवेसु-१२२५/प्र.क्र.१०/२५/एसएम. ३. दि.०३.११.२०२५
२. मा. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/टि-८व/२०२५-२६/१८२०१२९, दि. ३१.०३.२०२६.
३. मा. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/टि-८व/२०२५-२६/१८३०२०२, दि. ०६.०४.२०२६.
४. मा. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/ई-२४६३६८४/८-८व/२०२६-२७ दि.०४/११/२०२६.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील इ.१ ली ते इ.९ वी व इ. ११ वी या वर्गाची पटपडताळणी करणेकरीता संचालनालयाचे संदर्भीय पत्र क्र.२ व ३ अन्वये कळविण्यात आले नुसार दि. ११ एप्रिल २०२६, १५ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६ रोजी राज्यात पटपडताळणीचा उपक्रम पार पडला.
उपरोक्त दिवशी झालेल्या पटपडताळणीची आकडेवारी संचालनालयास प्राप्त झालेली आहे. सदर आकडेवारीचे विश्लेषण केले असता २५ टक्के ते ५० टक्के अनुपस्थिती असलेल्या २९४० शाळा आहेत, ५० टक्के ते ९९ टक्के अनुपस्थिती असणाऱ्या १२१८ शाळा आहेत. व १०० टक्के अनुपस्थिती असणाऱ्या ६३९ शाळा आढळुन आलेल्या आहेत.
त्याअनुषंगाने आपल्या जिल्हयातील २५ टक्के ते ५० टक्के अनुपस्थिती असलेल्या २९४० शाळांची, ५० टक्के पेक्षा जास्त अनुपस्थिती असणाऱ्या शाळांची तसेच ज्या शाळांची माहे एप्रिल मध्ये पटपडताळणी झालेली नाही अशा शाळांची ही पटपडताळणी करण्यात यावी.
ज्या शाळांमध्ये मागील वर्षी मोठ्या प्रमाणात अनुपस्थितीचे प्रमाण होते अशा शाळांमध्ये विद्यार्थी संख्या ही संचमान्यतेकरिता ग्राह्य धरण्यात आली आहे का? आणि आली असल्यास तसे सदर विद्यार्थी योग्य आहेत याची खातरजमा करावी. दोषी असणाऱ्या शाळांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
फेरपटपडताळणी करण्याची आवश्यकता असणाऱ्या शाळांची जिल्हानिहाय यादी सोबत जोडण्यात आली आहे. सदर शाळेतील योग्य विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राहय धरणेच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करावी.
तसेच फेरपटपडताळणी ऑनलाईन करणेकरीता आवश्यक असलेले User Manual सोबत जोडण्यात येत आहे, संकेतस्थळावर भेटीच्या दिवशी सदर नोंदी करणे अनिवार्य आहे.











