शासन परिपत्रक १२/०१/२०२४ मधील तरतुदीनुसार माध्यमिक शाळा व तुकडयांचा अहवाल सादर करणेबाबत madhyamik shala tukdya 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासन परिपत्रक १२/०१/२०२४ मधील तरतुदीनुसार माध्यमिक शाळा व तुकडयांचा अहवाल सादर करणेबाबत madhyamik shala tukdya 

संदर्भ :-

१. शासन निर्णय क्र. माशाअ-२०२२/प्र.क्र.२७५/भाग-१/एसएम-४, दि.६/०२/२०२३

२. शासन परिपत्रक क्र. माशाअ-२०२२/प्र.क्र.२७५/भाग-१/एसएम-४, दि.१२/०१/२०२४

वरील संदर्भ क्र.१ व २ पहावीत.

शासन परिपत्रक

शासन निर्णय दिनांक ०६/०२/२०२३ मध्ये नमूद अ, ब व क मधील माध्यमिक शाळा, शाळांमधील वर्ग/तुकडयांना अटी व शर्तीच्या अधीन राहून अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेले आहे. सदर शासन निर्णयान्वये संचमान्यता सन २०२२-२३ मधील शेवटच्या वर्गातील आधार प्रमाणित पटसंख्या ग्राह्य धरणेबाबत निर्देश आहेत.

शासन परिपत्रक दिनांक १२ जानेवारी २०२४ मधील (४) मध्ये “शेवटची पटसंख्या कमी असलेल्या प्रकरणामध्ये २०२३ च्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर आधारित शाळेच्या मान्य वर्गाची मान्य सरासरी विद्यार्थी संख्या गृहीत धरून शाळा अनुदानासाठी पात्र करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त (शिक्षण) यांनी मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी शासनास सादर करावा” असे नमूद केले आहे.

संच मान्यता

सबब शासन निर्णय दिनांक ६/०२/२०२३ अन्वये पात्र ठरलेल्या तथापि सन २०२२-२३ संचमान्यतेमध्ये शेवटच्या वर्गातील पटसंख्या कमी असल्याने अपात्र ठरलेल्या माध्यमिक शाळा तुकडयासंदर्भात शासन परिपत्रक दिनांक १२/०१/२०२४ मधील (४) मध्ये नमूद तरतुदीनुसार अट पूर्ण करणाऱ्या माध्यमिक शाळा व तुकडयांचा अहवाल दिनांक २२/०८/२०२५ पूर्वी संचालनालयास सादर करावा.

Related posts:

Leave a Comment