राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ.८ वी जाहीर प्रगटन nmms exam jahir pragatan
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-४ यांचेमार्फत सन २०२५-२६ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी दि. २१ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार होती.
तथापि महाराष्ट्र लोकसेवा आयागामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दि. २१ डिसेंबर, २०२५ ऐवजी दि. २८ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.











