सरकारी असो की कंत्राटी; सर्वांना मिळेल जनआरोग्य योजनेचा लाभ ayushyaman bharat health scheme
७ लाख ५७ हजार ५३० लोकांची ई-केवायसी पूर्ण, कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार निर्णय
जालना : राज्य सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रित करून मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत राज्यातील महसूल विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषदेसह सर्वच. शासकीय, निमशासकीय, कंत्राटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत. मोफत उपचारांचा लाभ- मिळणार आहे. सरकारतर्फे सर्व कर्मचाऱ्यांचे आयुष्मान कार्ड तत्काळ काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. गु जिल्ह्यात सध्या सुमारे ४० टक्के कर्मचाऱ्यांनीच आयुष्मान कार्ड काढले असून, उर्वरित कर्मचाऱ्यांचा डेटा अद्याप प्रलंबित आहे. या निर्णयामुळे उपचारांच्या खर्चाची चिंता मिटणार आहे. विशेषतः कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कवच’ मिळाले आहे. यात शस्त्रक्रिया, गंभीर आजार, मातृत्व सेवा, कॅन्सर उपचारांसह अनेक आजारांचा समावेश आहे.
पाच लाखांपर्यंत मोफत उपचार
शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही वार्षिक ५ लाखांचे आरोग्य कवच मिळणार आहे.
या गंभीर आजारांचा समावेश,
यात कॅन्सर, हृदयविकार, किडनी, न्युरो, अपघाती उपचार, बालरोग, शस्त्रक्रिया, आयसीयू आदी सुविधा मिळणार आहेत.
आता बिलाची चिंता मिटली
आता मोठ्या शस्त्रक्रिया व आपत्कालीन उपचारासाठी खासगी रुग्णालयातही मोफत कॅशलेस सेवा असणार आहे.










