अणुबॉम्ब, भौतिकशास्त्रचे संशोधक “अल्बर्ट आइन्स्टाइन” scientist albart ainestine 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अणुबॉम्ब, भौतिकशास्त्रचे संशोधक “अल्बर्ट आइन्स्टाइन” scientist albart ainestine 

(१४ मार्च १८७९ १८ एप्रिल १९५५)

अणुबॉम्ब, भौतिकशास्त्र संशोधक

इसवी सन १९०५ साली अल्बर्ट हर्मन आइन्स्टाइन नामक जर्मन युवकाने वयाच्या केवळ २६ व्या वर्षातच तीन अति महत्त्वाचे शोधप्रबंध ‘अन्नाल डेर फिजिक्स’ नामक जर्मन नियतकालिकात प्रकाशित केले. प्रकाश विद्युतीय परिणाम, ब्राऊनियम मोशन आणि विशेष सापेक्षतेचा सिद्धांत अशा या तीन आइस्टाइनच्या शोधांची विज्ञानाने जगात खळबळ उडवून दिली. झुरिच विद्यापीठाने त्यांना आचार्यांची उपाधी बहाल केली. आइन्स्टाइनच्या प्रत्येक शोधाकरता भौतिकशास्त्रातील जागतिक बहुमानाचे नोबेल पारितोषिक मिळू शकले असते. त्यांना इ.स. १९२१ सालचे भौतिकशास्त्रात प्रदान करण्यात आलेले ‘नोबेल पारितोषिक प्रकाश विद्युतीय परिणामासाठी होते. आइनस्टाइनच्या शोधामुळे न्यूटन प्रणित अनेक सिद्धांतांना नवे आयाम प्राप्त झाले. जुने नियम कालबाह्य ठरू लागले. काळ, काम, वेग, वस्तुमान गुरुत्वाकर्षण या विषयांत असलेल्या तत्कालीन संकल्पनांना आइस्टाइनच्या शोधामुळे आव्हान निर्माण झाले. इसवी

सन १९०५ सालानंतरचा काळ हा आइन्स्टाइन फिजिक्सचा काळ समजण्यात येऊ लागला. अल्बर्ट आइनस्टाइन नाव ऐकले की, सर्वप्रथम E = mc² हे समीकरण डोळ्यांसमोर येते. या समीकरणमुळे शास्त्रज्ञांचा संपूर्ण विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. वस्तुमान व ऊर्जा या परस्पर रूपांतरणीय आहेत. ही संकल्पना त्या काळच्या प्रचलित सिद्धांतांना धक्का देणारी होती. वस्तुमान व ऊर्जा यांचे अक्षय्यतेचे नियम पुन्हा नव्याने लिहिण्याची गरज या समीकरणाने निर्माण झाली.

बोस आइन्स्टाइन संघनन :

इसवी सन १९२९ पूर्वी मानवाला पदार्थांच्या फक्त चारच अवस्था माहीत होत्या. त्या म्हणजे घन अवस्था, द्रव, वायू आणि प्लाझ्मा या होय. ‘प्लाझ्मा अवस्था’ म्हणजे घन व ऋण प्रभारी पदार्थाचे मिश्रण असून ही अवस्था सूर्यमंडल व ताऱ्यांवर अस्तित्वात असते. इ.स.१९२९ साली सुप्रसिद्ध भारतीय पदार्थ वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस आणि अल्बट आइनस्टाइन यांनी पदार्थाची ५वी अवस्था असू शकते, असे अनुमान काढले. ही थिओरेटिकल संकल्पना इसवी सन १९९६ मध्ये न्यूजर्सी पदार्थ विज्ञान प्रयोगशाळेत वुस्फगेंग किट्टरली कार्ल ई. वीयमन आणि इराकी कॉर्नेल या अमेरिकन संशोधकांनी निर्माण करून दाखविली. पदार्थांच्या या पाचव्या अवस्थेचे नाव आहे ‘बोस आइन्स्टाइन संघनन’ बोस आइनस्टाइनच्या

संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त केल्याबद्दल या वैज्ञानिकांना बहुमानाचे ‘नोबेल पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. सत्येंद्रनाथ बोस यांचे आइन्स्टाइन सोबतचे संशोधन ‘बोस आइनस्टाइन स्टॅटिस्टिक्स’ या शीर्षकाने प्रसिद्ध असून भौतिकशास्त्रातील विदयार्थी आजदेखील त्याचे अध्ययन करत असतात. आइन्स्टाइनचा जन्म जर्मनीत झाला. भौतिकशास्त्र हा त्याचा आवडीचा विषय. त्याची बहुतेक संशोधने ही भौतिकशास्त्रातीलच आहेत. त्याचा सापेक्षतावादाचा सिद्धांत हा त्याच्या अनेक सिद्धांतांपैकी एक महत्त्वाचा सिद्धांतः सूर्यासारख्या प्रचंड वस्तुमान असलेल्या गोलाच्या गुरुत्वाकर्षणामुळे प्रकाशकिरण देखील आपला मार्ग बदलतात, असा सिद्धांत त्याने मांडला. या सिद्धांताची प्रचिती १९१९ मध्ये खग्रास सूर्यग्रहणाच्या दरम्यान आली. ताऱ्यांपासून निघालेले प्रकाशकिरण सूर्याजवळून जाताना चक्क वळून आल्याचे सिद्ध झाले. प्रकाश हा ‘फोटॉन’ या कणांपासून तसेच लहरींपासून बनलेला आहे, असे प्रतिपादन त्याने केले. प्रकाशाच्या विद्युतीय परिणामांचे नियम या शोधांमुळे १९२१ मध्ये त्याला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. हिटरलच्या काळात जर्मनीत ज्यू लोकांना अन्यायकारक वागणूक मिळत असे. या वागणुकीला कंटाळून १९३१ मध्ये त्याने जर्मनी सोडले व तो अमेरिकेला गेला.

त्याचे ३०० च्या वर शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांचे संशोधन क्लिष्ट असत. एकदा त्यांची पत्नी एल्सा त्याला म्हणाली, “तुझ्या संशोधनाब‌द्दल मला काहीतरी माहिती दे. लोक त्याविषयी इतके बोलत असतात आणि मी मात्र काही माहीत नसते म्हणून मूर्खासारखी गप्प बसते.” वस्तुस्थिती अशी होती की, हे सर्व प्रकरण एल्साच्या आवाक्याबाहेरचे होते; पण तसे स्पष्ट कसे सांगणार? म्हणून अल्बर्ट पत्नीला म्हणाला, “तू लोकांना असं सांग, की मला सर्व माहीत आहे; परंतु ते गोपनीय असल्यामुळे मी काही बोलू शकत नाही.” वेळोवेळी वैज्ञानिकांनी आइन्स्टाइनच्या नियमांचा उपयोग करूनसुद्धा अनेक शोध भौतिकशास्त्रात लावले, ही परंपरा आजही कायम आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या ‘हिरोशिमा’ आणि ‘नागासाकीवर’ अणुबॉम्ब टाकला.

Related posts:

Leave a Comment