महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ साठी दि. २२ व २३ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसांकरिता निवडणूक प्रशिक्षण तसेच पर्यवेक्षक बी.एल.ओ. (BLO) व तद्अनुषंगिक कामकाजातून वगळणेबाबत teacher eligibility test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ साठी दि. २२ व २३ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसांकरिता निवडणूक प्रशिक्षण तसेच पर्यवेक्षक बी.एल.ओ. (BLO) व तद्अनुषंगिक कामकाजातून वगळणेबाबत teacher eligibility test 

महोदय,

उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येते की, यावर्षी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरिता कर्मचारी व अधिकारी यांच्या दि.२२ व २३ नोव्हेंबर २०२५ रोजी नियुक्त्या करण्यात आलेल्या असून दोन्ही दिवसांकरिता संपूर्ण वेळ सदर कर्मचारी व अधिकारी कार्यरत राहणार आहेत. संपूर्ण राज्यभरामध्ये नगरपरिषद व नगर पंचायतींची सार्वत्रिक निवडणूक दि. ०२ डिसेंबर २०२५ रोजी जाहिर करण्यात आलेली आहे. दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परीक्षेमध्ये तब्बल ४ लक्ष शिक्षक परीक्षार्थी, शिक्षण विभागतील अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असल्याने दि. २२ व २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये कोठेही शिक्षक परीक्षार्थी व परीक्षा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक कामकाजामध्ये सहभागी करुन घेणे योग्य होणार नाही.

सबब शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ही अतिसंवेदनशिल परीक्षा असल्याकारणाने व या परीक्षेच्या सनियंत्रण समितीचे आपण स्वतः अध्यक्ष असल्याने वरील सर्व बाबी लक्षात घेऊन नगरपरिषद व नगर पंचायतींच्या सर्वात्रिक निवडणूकांचे कामकाज विषयक प्रशिक्षण अथवा बी.एल.ओ. (BLO) व तद्अनुषंगिक कामकाज दि. २२ व २३ नोव्हेंबर २०२५ रोजी न घेता केवळ या दोन दिवसांकरिता अतिमहत्त्वाच्या या परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक विषयक कामकाज सोपविण्यात येऊ नये, अशी आपणास विनंती करण्यात येत आहे.

Related posts:

Leave a Comment