अधिसूचना adhisuchna 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिसूचना adhisuchna

क्रमांक सार्वसु-११२५/प्र.क्र. २२९/जपुक (२९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१चा २६) च्या कलम २५ मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८-जेयुडीएल-तीन दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे राज्यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मंगळवार दिनांक २ डिसेंबर, २०२५ रोजी खालील अनुसूचीत दर्शविलेल्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत आहे:-

२. मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदरची अधिसूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालोल शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे / मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी. ही सार्वजनिक सुट्टी उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इ.ना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

शासन परिपत्रक pdf download 

३. माहिती व जनसंपर्क विभाग यांनी सदर अधिसूचना वृत्तपत्र व इतर प्रसारमाध्यमातून प्रसिध्द करायी.

Related posts:

Leave a Comment