इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी बहुपर्यायी प्रश्नसंच scolarship exam question bank
1. ‘माय मराठी’ या कवितेत मराठी भाषेची कशाशी तुलना केली आहे?
1) आईशी
2) नदीशी
3) शाळेशी
4) पुस्तकांशी
2. ‘बंडूची इजार’ या पाठातून कोणता संदेश मिळतो?
1) श्रीमंती
2) आळस
3) कष्टाचे महत्त्व
4) भांडण
3. कविता राऊत कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
1) क्रिकेट
2) कबड्डी
3) धावणे
4) कुस्ती
4. ‘कठीण समय येता’ या पाठाचा मुख्य आशय काय आहे?
1) राग
2) मदत व सहकार्य
3) भीती
4) स्पर्धा
5. ‘माहेर’ कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख आलेला आहे?
1) गोदावर
2) कृष्णा
3) भीमा
4) तापी
6. ‘अभंग’ हा साहित्यप्रकार कोणी लिहिला आहे?
1) पु. ल. देशपांडे
2) संत नामदेव
3) वसंत बापट
4) ग. दि. माडगूळकर
7. ‘माझं शाळेचं नक्की झालं!’ या पाठाचा लेखक कोण?
1) विमल मोरे
2) संजीवनी मराठे
3) गफूर हाश्मी
4) बहिणाबाई
8. ‘शब्दकोश’ वापरण्याचा मुख्य उद्देश कोणता?
1) कथा वाचणे
2) चित्र पाहणे
3) शब्दांचे अर्थ शोधणे
4) कविता म्हणणे
9. ‘माळीण’ गावात ……या कारणामुळे दरड कोसळली.
1) भूकंप
2) ज्वालामुखी
3) अनुस्फोट चाचणी
4) पाऊस
10. ग्रामगीता हा ग्रंथ कोणाचा ?
1) आचार्य विनोबा भावे
2) सुदाम सावरकर
3) महात्मा गांधी
4) तुकडोजी महाराज
11. ‘नाम’ म्हणजे काय?
1) कृती दर्शवणारा शब्द
2) गुण दर्शवणारा शब्द
3) व्यक्ती, वस्तू, प्राणी यांचे नाव
4) जोडशब्द
12. ‘पाणी’ या शब्दाचे लिंग ओळखा?
1) पुल्लिंग
2) स्त्रीलिंग
3) नपुंसकलिंग
4) उभयलिंग
13. ‘न्यारी’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
1) सकाळचे जेवण
2) मैत्री
3) आपली
4) वेगळी
14. ‘सुंदर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
1) मोठा
2) कुरूप
3) स्वच्छ
4) लहान
15. ! या चिन्हाला काय म्हणतात?
1) स्वल्पविराम
2) प्रश्नचिन्ह
3) पूर्णविराम
4) उदगारवाचक चिन्ह
16. ‘आम्ही शाळेत जातो.’ या वाक्याचा काळ कोणता?
1) भूतकाळ
2) भविष्यकाळ
3) वर्तमानकाळ
4) आज्ञार्थी
17. ‘मुलगा’ या शब्दाचे अनेकवचन कोणते?
1) मुलगा
2) मुलगे
3) मुले
4) मुलांना
18. ‘शिस्त’ या शब्दाचा अर्थ कोणता?
1) आळस
2) नियमपालन
3) गोंधळ
4) भीती
19. खालीलपैकी दुतर्फी माहितीचे देवाणघेवाण करणारे साधन कोणते?
1) चिड्डी
2) फॅक्स
3) वर्तमानपत्र
4) मोबाईल
20) रिकाम्याजागी योग्य सर्वनाम लिहा.
कर्ण दानशूर होता. दररोज दान द्यायचा.
1) तो
2) ती
3) त्या
4) कर्ण







