राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या Online बदली प्रणालीकरिता SMS व E-mail सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत online teacher transfer pranali
वाचा-१. प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या दि. १४.०८.२०२५ रोजीच्या
बैठकीचे इतिवृत्त.
२. महाआयटी या संस्थेला दि. ११.०९.२०२५ रोजी देण्यात आलेले कार्यारंभ आदेश.
प्रस्तावना:-
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली अधिक पारदर्शक, सुलभ व डिजिटल करण्याच्या दृष्टीने विभागात Online Teacher Transfer (OTI) हे माहिती तंत्रज्ञान आधारित पोर्टल Vinsys IT Services(1) Pvt.Ltd. या संस्थेकडून तयार करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ONLINE बदली प्रणालीकरिता Vinsys IT Services Pvt Ltd यांना दि. २७/०६/२०२२ रोजी ३ वर्षाच्या कालावधीकरिता प्रतिवर्ष २ कोटी याप्रमाणे ६ कोटी SMS व ६ कोटी Email सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता कार्यादेश देण्यात आले होते. सदर कार्यादेशाची मुदत संपुष्टात आली असल्याने नव्याने SMS व Email सुविधा उपलब्ध करुन घेण्याचे प्रस्तावित आहे. ONLINE शिक्षक बदलीकरिता दि. १९ जुलै, २०२५ पर्यंत प्रत्येकी १,६८,९५,४६५/- इतके ई-मेल व SMS चा वापर करण्यात आला असून बदलीप्रणालीच्या कामकाजासाठी अजून SMS व Email ची आवश्यकता विचारात घेऊन १ वर्षासाठी प्रत्येकी २ कोटी इतक्या प्रमाणात SMS व Email करिता Vinsys IT Services Pvt Ltd या कंपनीने मागणी केली होती. माहिती तंत्रज्ञान विभागाचा शासन निर्णय दि. ९ ऑगस्ट, २०१६ मधील मुद्दा क्र. ३.३ अन्वये महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ हे राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रमे महामंडळ यांच्यासाठी माहिती तंत्राज्ञान विषयक संयंत्रे, साधनसामुग्री व सेवांचा पुरवठा करणारी राज्याची एकमेव यंत्रणा असेल असे नमुद केले आहे त्यानुसार सदर सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी महाआयटी यांना दि. १४.०८.२०२५
रोजीच्या प्रकल्प अंगलबजावणी रागितीच्या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत उपस्थित महाआयटी यांच्या प्रतिनिधींव्दारे सदर सेवा पुरविण्यासाठी सांगितलेल्या दराची तुलना Vinsys IT Services Pvt Ltd यांच्या सध्याच्या दराशी केली असता महाआयटीचे दर तुलनेने कमी व वाजती (रु. १८,०००/- per year For unlimited E-mals and रु. ८,००,०००/- per year for or SMS) असल्याचे दिसून आल्याने महाआयटीकडून प्रस्ताव मागविण्याचा निर्णय दि. १४ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता, त्याअनुषंगाने महाआयटीकडून Email व्दारे प्रस्ताव मागविण्यात आला होता. त्यानुसार महामायटी या संस्थेने २ कोटी SMS साठी प्रति वर्ष ८ लाख इतकी रक्कम व Emal करिता प्रति वर्ष ३९.२४०/- इतक्या रक्कमेची मागणी केली होती. तथापि, दि. १४ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत महाआयटीच्या प्रतिनिधींव्दारे रु. १८,०००/- per year For unlimited E-mails and . c,00,000/- per year for २er SMS अशा प्रकारचे दर सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत Firal करिता नमुद करण्यात आलेले प्रति वर्ष रु.१८,०००/- हे दर अंतिम करण्यात येऊन त्यानुसार महाआयटी या संस्थेला दि. ११.०९.२०२५ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. सदर प्रस्तावाला दि. १४/०८/२०२५ रोजीच्या प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता प्राप्त झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या Online बदली प्रणालीकरिता SMS व E-mail सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.
शासन निर्णयः
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या Online बदली प्रणालीकरिता SMS E-mail सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी Maharashtra information Technology Corporation Lim. (Maha(T) या संस्थेला रु.९.६५.२४०/- (करासह) इतकी रक्कम अदा करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
२. यासाठीचा खर्च मागणी क्रमांक एल-४ ३४५१-सेक्रेटरीएट-आर्थिक सेवा (०१(०३) ई गव्हर्नन्स प्रकल्पाची अंमलबजावणी १७ संगणक खर्च (३४५१ २८०८) मागणी क्रमांक एल-४ (योजनांतर्गत) (दत्तमत)” या लेखाशिर्षांतर्गत सन २०२५-२६ मध्ये उपलब्क झालेल्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
३. सदर शासन निर्णय वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांकः विअप्र २०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, भाग-२, दि. १७ एप्रिल, २०१५ अन्वये सुधारित केल्यानुसार वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ सोबतच्या परिशिष्टातील भाग पहिला उप विभाग दोन, अनुक्रमांक
२७-अ, नियम क्रमांक-७६ अन्वये विभागांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
शासन परिपत्रक pdf download
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५१२२४१३३६३५२८२० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.










