क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त – 2026 अप्रतिम मराठी भाषण krantjoti savitribai fule jayanti
स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात,
पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती …
म्हणून तर आज जगती,
अमर आहे सावित्री….
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन तसेच माझ्या बाल मित्रानो मी तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी विनंती करतो/करते
सर्वप्रथम थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, भारतातील पहिल्या शिक्षीका सावित्रीबाई फुलेंना माझे विनम्र अभिवादन !
सावित्रीबाई फुले यांचे कार्य नेहमीच आदर्श राहिले आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील नायगाव मध्ये त्यांचा जन्म झाला. बालवयातच त्यांचा विवाह ज्योतिरावांशी झाला. तेथून पुढेच त्यांच्या जीवनाला विलक्षण कलाटणी मिळाली.
ज्योतिबा फुलेंनी त्यांना खूप शिकवले आणि त्यांच्या साथीने १८४८ साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. समाजाने प्रचंड विरोध केला पण तो झुगारुन त्यांनी स्त्री शिक्षण सती प्रथा जातीव्यवस्था या विरोधात जोतिरांवाना खंबीरपणे साथ दिली. अनाथांसाठी आश्रम सुरू केला. त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या.








