12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त प्रभावी भाषण rajmata jijau jayanti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त प्रभावी भाषण rajmata jijau jayanti 

सम्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रोंनो, आजपासून 400 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या छातीमध्ये रोवलेली पारतंत्र्याची पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. 12 जानेवारी 1598 या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे मां जिजाऊंचा जन्म झाला.

वडील लखुजी जाधव आणि आई म्हाळसाबाई यांच्या घराण्यात हे कन्यारत्न जन्माला आले. जिजाऊंचा पुढे शहाजी राजे भोसले यांच्यासोबत विवाह झाला यांच्याच पोटी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय जन्मले.

‘त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या जिजाऊ मातेला घडविला जाणता राजा, जन्म दिला स्वराज्य गाथेला जिजा म्हणजे तुळजाभवानी, जिजा म्हणजे विजयाची गाथा रचणारी आदिमाया. जिजाऊ बालवयापासूनच महत्त्वकांक्षी आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण होत्या. आपले थोरले बंधू दत्तोजी यांच्याकडून त्या तलवारबाजी, घोडेस्वारी शिकल्यात आणि वडील लखोजीराव यांच्याकडून राजनीति आणि न्यायनीती शिकल्या. ज्या युद्ध शास्त्राचा आणि राजनीतीचा योग्य वापर त्यांनी आपला लेक शिवबाला शिकविला.

मां जिजाऊ महाराजांच्या आईच नव्हत्या तर मार्गदर्शक आणि प्रेरणाच्या स्त्रोत होत्या. “झिजून मराव पण थिजून मरू नये” हे राजमाता जिजाऊंनी शिवरायांना शिकविले. सीतेचे हरण करणारा रावण बलाढ्य होता परंतु त्याचा वध करणारा राम खरा पराक्रमी म्हणून प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे एकच ध्येय असते ते म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे. हा विचार त्यांनी शिवरायात रुजविला आपले थोरले पुत्र संभाजी राजे भोसले, आपले पती, शहाजी राजे भोसले यांच्या निधनानंतरही आऊसाहेब खचल्या नाहीत. गरीब जनतेच्या सुखासाठी, स्वधर्म आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हाव हे स्वप्न त्या उराशी बाळगून जगल्या. हजारो मावळ्यांच्या शौर्यातून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड पराक्रमातून अखेर हे स्वप्न साकार झाले. ६ जुन १६७४ या दिवश महाराजांचा राज्याभिषेक झाला स्वराज्य जन्माला आले.

परंतु यानंतर केवळ 11 व्या दिवशी दिनांक १७ जुन। १६७४ रोजी ही स्वराज्य जननी अवघ्या महाराष्ट्राला चिरकाळ टिकणारा स्वाभिमान शिकवून अनंतात विलीन झाली.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून मी माझे भाषण संपवते !

! जय जिजाऊ, जय शिवराय !

 

Related posts:

Leave a Comment