थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत thakit online dyayak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत thakit online dyayak 

सन २०२५-२६. मुदतवाढ.

संदर्भ- १) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २४१५/(३४/१५)/अर्थसंकल्प, दिनांक १५/७/२०१७.

२ ) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/थकीत वेतन/२०२१/३०७० दिनांक ४/८/२०२१

३) दिनांक ६/६/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.

४) दिनांक ३/९/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.

५) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७दिनांक-११/९/२०२४.

६) संचालनालयाचे परिपत्रक क्र. प्राशिसं/अंदाज-२०३/थकीतशाओं/२०२४/६०९४ दिनांक-१२/९/२०२४.

७) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२५/टि-७/थकीत/ऑनलाईन/०५३६९ दिनांक-१९/११/२०२५.

सन २०२४-२५ पासून शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. यासंदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्र. ५ व ६ अन्वये देण्यात आलेल्या आहेत. तसेच संदर्भ क्र. ७ अन्वये सन २०२५-२६ मध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.

संदर्भ क्र. ७ अन्वये सन २०२५-२६ मध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी डिडिओ१ (मुख्याध्यापक) शाळा स्तर यांना दिनांक ३१/१२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतू अद्यापही बहुतांश शिक्षक कर्मचा-यांचे थकीत देयके शाळा स्तरावरून शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर होऊ शकलेली नाही. यासाठी वेतन पथक कार्यालय व विविध संघटनांकडून सन २०२५-२६

मध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळणेबाबत विनंती करण्यात आलेली आहे. सबब डीडीओ-१ (मुख्याध्यापक) शाळा स्तरावरुन थकीत देयके (नियमित व न्यायालयीन प्रकरणे) (केवळ १ ते

६ वर्ष व ६ वर्षापेक्षा जास्त कालावधीचे) ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक १०/०१/२०२६ पर्यंत मुदतवाढ

देण्यात येत आहे. त्यानंतर सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामाठी थकीत देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही.

तसेच शासनास सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीचे थकीत देवकाचा प्रस्ताव विवरणपत्र-३ मध्ये ऑनलाईन सादर कराये, प्रस्तावासोवत तपासणीसूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने प्रस्ताव २ प्रतीमध्ये संचालनालयास सादर करावा,

वर नमूद कालमर्यादा तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी. सन २०२५-२६ मधील शालार्थ प्रणालीमधील थकीत देयकासंदर्भात केलेल्या सुधारित सुविधांच्या गविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये (User Manual) पहावे.

शासन निर्णय pdf download

 

Related posts:

Leave a Comment