राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सोपे व सुंदर मराठी भाषण rajmata jijau jayanti bhashan
मुजरा माझा त्या माता जिजाऊंना
घडविले त्यांनी शुर शिवबांना…
साक्षात होत्या त्या आई भवानी
जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी
१. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
२. माझे नाव राज पाटील.
३. आज १२ जानेवारी आपण राजमाता जिजाऊंची जयंती उत्सहात साजरी करत आहोत.
४ राजमाता जिजाऊयांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्हयातील सिंदखेडराजा येथे झाला.
५. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते.
६. राजमाता जिजाऊ यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
७. पुणे येथील शिवनेरी गडावर त्यांनी शिवबांना जन्म दिला.
८. शिवनेरी गडावरील शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ठेवण्यात आले.
९. त्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला.
१०. दुर्दैवाने राजमाता जिजाऊंनी १७ जून १६७४ रोजी अखेरचा श्वास घेतला.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.









