इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ बाबत. प्रवेश प्रक्रियेतील उर्वरीत विद्यार्थ्यांबाबत eleventh online pravesh prakriya
संदर्भः- दिनांक २५/०२/२०२५ आणि दिनांक ०६/०५/२०२५ रोजीचा शासन निर्णय
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, सन २०२५-२६ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रकियेतील विद्यार्थी आणि पालक यांच्या विनंतीनुसार अंतिम विशेष फेरी दिनांक १३ डिसेंबर २०२५ ते १७ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
सदर अंतिम विशेष फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कनिष्ट महाविद्यायल अलॉट करण्यात आले परंतू संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले नाहीत आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश अर्ज भरलेले आहेत परंतू कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झालेले नाही अशा विद्यार्थ्यांकरीता खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
अशा विद्यार्थ्यांकरीता आपल्या स्तरावरुन दिनांक ०६/०१/२०२६ आणि ०७/०१/२०२६ या कालावधीत प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच दिनांक ०८/०१/२०२६ ते १०/०१/२०२६ या कावलधीत संबंधित विद्यार्थ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करुन आपल्या स्तरावरुन ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
संबंधित विद्यार्थ्यांची माहिती आपणास उपलब्ध करुन देण्यात येईल.











