दिप प्रज्वलन मराठी चारोळ्या dip prajwalan carolya

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दीप प्रज्वलन मराठी चारोळ्या dip prajwalan carolya 

दीप लावूया ज्ञानाचा….. प्रकाश पसरेल मानवतेचा

दीप लावूया श्रद्धेचा….. प्रकाश पसरेल भक्तीचा

दीप लावूया मांगल्याचा….. प्रकाश पसरेल पावित्र्याचा

दीप लावूया अ लावूया आत्मते आत्मतेजाचा….. प्रकाश पसरेल साक्षात्काराचा

दीप लावूया सामर्थ्याचा….. प्रकाश पसरेल विवेकाचा

➖➖➖➖🎇🎇🎇🎇➖➖➖➖

” ईश्वरा दे ….. प्रकाश दान

दे आम्हा जगण्याचे भान

दाटला जरी अंधार भोवती

हृदय ठेव तेजो मान ”

➖➖➖➖🎇🎇🎇🎇➖➖➖➖

दीपप्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तो संकल्प आहे…

अज्ञानरूपी अंधार नष्ट करण्याचा संकल्प

तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प

नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प

कर्तृत्वसिद्ध कर्तृत् हातातून प्रकाशमान कार्य घडविण्याचा संकल्प

चला करूयात हा तेजस्वी संकल्प

➖➖➖➖🎇🎇🎇🎇➖➖➖➖

जपू वारसा संस्कृतीचा

दिवा वातीला जपतो जसा

नको भीती अंधाराची

प्रकाशाचा घेऊ वसा

➖➖➖➖🎇🎇🎇🎇➖➖➖➖

” संपतो अंधार सारा तेज येता त्या क्षणी…

अन नव्याने झेप घेते जागलेले स्वप्न मनी “

➖➖➖➖🎇🎇🎇🎇➖➖➖➖

ज्योत-ज्योत चेतवा उजळूद्या दाही दिशा….

उमलू दया मनामध्ये तेजाळण्याची नवी आशा….

➖➖➖➖🎇🎇🎇🎇➖➖➖➖

ज्ञानाच्या घेऊन ज्योती… उजळू मनामनातील राती

शब्दातुनी जोडत जाऊ… मानवतेची नाती

दाटलेल्या अंधाराला… विवेकाने देऊ छेद

मरगळलेल्या मनामध्ये… विश्वासाने भरू उमेद

कृती मधुनी पेरत जाऊ… संस्कारांचे मोती

ज्ञानाच्या घेऊन ज्योती…

उजळू मनामनातील राती

➖➖➖➖🎇🎇🎇🎇➖➖➖➖

” तिमिराला भेदुनी उजळावा असा प्रकाश

सगळीकडे पसरावी नव्या उद्याची नवी आस

परस्परांचे सहकार्य परस्परांची साथ

तेवत जाते प्रगतीची एक – एक नवी वात

ज्योतीने ज्योतीला प्रज्वलित करूया

संस्काराचे नवे बीज मना- मनात पेरूया…..

➖➖➖➖🎇🎇🎇🎇➖➖➖➖

Related posts:

Leave a Comment