प्रभावी सूत्रसंचालन सत्कार समारंभासाठी सुंदर चारोळ्या satkar samarambha charoli 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रभावी सूत्रसंचालन सत्कार समारंभासाठी सुंदर चारोळ्या satkar samarambha charoli 

” परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले आले फळा

सत्काराच्या पुष्पमाला अर्पूया त्यांच्या गळा ”

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रत्येक यशाचे पाऊल… ज्यांच्याकडे वळते

जीवन कसे जगावे… ज्यांना पाहून कळते

प्रत्येक सत्कार्याला… ज्यांचे पाठबळ मिळते

कर्तव्य म्हणजे काय?.. हे ज्यांना पाहून कळते

अशा कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्वांचा सन्मान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

” कर्तबगारीच्या कळसावर तुमच्या

खिळून राहती सर्वांच्या नजरा

अलौकिक धैर्यास तुमच्या

आमचा मानाचा मुजरा”

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

“बुद्धीच्या जोडीला … तत्त्वांची ओढ आहे

उत्तमाच्या ध्यासाला उदात्ततेची आस आहे

तुमचा गौरव करण्यासाठीच

आज सत्काराची आरास आहे ”

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

” व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे…

व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे

आपला सत्कार करणे….

हा तर आमचाच बहुमान आहे ”

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

“तुमच्यामुळे सामान्यांच्या डोळ्यात स्वप्न आकारले

तुमच्यामुळे दीन-दुबळ्यांचे सुखी जीवन साकारले”

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तुम्ही चारित्र्यवान… नीतीमान …धैर्यवान

मनामध्ये जपता अखंड समाजभान …..

काला अखंड कार्यसिद्धीसाठी करता जिवाचे रान…

म्हणूनच आदराने लवते सर्वांची मान “

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तुमच्या मनगटातील बळाने आभाळ जिंकले

तुमच्या शब्दांनी मने जागवली

उगवत्या पिढीचे आपण नायक आहात

उज्वल परंपरेचे पाईक आहात

तुमच्या गुणांचा गौरव ज्ञानाला वंदन

तुमच्या सत्कार्याचा हा सत्कार…….

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हृदयातल्या आदराचे प्रतीक म्हणजे सत्कार

काळजातल्या मायेचे संचित म्हणजे सत्कार

कर्तुत्ववान मस्तकावर..

सन्मानाचा शिरपेच म्हणजे सत्कार…….

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

” जिथे – जिथे लाभली संधी संधीचे तुम्ही सोने केले

परिसस्पर्शी जगणे तुमचे सुंदरतेचे देणे केले

आनंदाचा प्रत्येक क्षण

मनात साठवून घेत आहोत

मनातला स्नेह आमच्या

सत्कारातून देत आहोत ”

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जसे फुलांचे सुगंध देणे ठरलेले

तसे तुमचे जीवन परोपकाराने भरलेले

जसे सूर्याचे प्रकाश देणे ठरलेले

तसे तुमचे जीवन सत्कार्याने भरलेले

जसे नदीचे वाहत राहणे ठरलेले

तसे तुमचे जीवन त्यागाने भरलेले……..

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

Related posts:

Leave a Comment