प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘असाक्षर मुक्त गावाची शपथ घेणेबाबत republic day shapath
2) शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
संदर्भ: 1) शासन निर्णय क्रमांक: नभासाका-0322/प्र.क्र.39/ एस.डी.2, मंत्रालय, मुंबई-32 दि. 14 ऑक्टोबर, 2022.
2) शासन निर्णय क्रमांक: नभासाका 0322/प्र.क्र.39/ एस.डी.2, मंत्रालय, मुंबई 32 दि. 25 जानेवारी, 2023.
उपरोक्त संदर्भ क्र. 1 नुसार, केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने
आदेशित केले आहे. संदर्भ क. 2 नुसार, सन 2022 ते 2027 पर्यंत चालणाऱ्या उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी
राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय / गटस्तरीय / शाळा स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.
उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसारासाठी राज्य स्तरावरून विविध उपक्रम राबविले जात आहेत. दि. 26 जानेवारी, 2026 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. या दिवशी प्रत्येक शाळेत ‘असाक्षर मुक्त गावाची शपथ घेतल्यास 100% साक्षर महाराष्ट्र होण्यासाठी मदत होणार आहे.
तरी सदर ‘असाक्षर मुक्त गावाची शपथ प्रत्येक विद्यार्थ्याने घेण्याबाबत आपण आपल्या अधिनस्त यंत्रणेस आदेशित करावे. सदर उपक्रमाबाबत वर्तमानपत्रे व सोशल मेडिया यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मोफत प्रसिद्धी देण्यात यावी.
शपथ परिपत्रक pdf download
सोबत : ‘असाक्षर मुक्त गावाची शपथ
‘असाक्षर मुक्त भावाची शपथ’ / ‘साक्षरता शपथ‘
मी………………अशी शपथ घेतो / घेते की, माहो संपूर्ण कुटुंब, गाव, 26 जानेवारी 2027 पर्यंत साक्षर करेल, मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही.
मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन, लेखन व संख्याज्ञान शिकण्यासाठी प्रयत्न करेन. मी किमान दोन असाक्षर व्यक्ती साक्षर करणेसाठी प्रचार-प्रसार करील,
मुलगा असो वा मुलगी, स्त्री असो वा पुरुष, सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहीन. राज्याचे १०० टक्के साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईन.
मी स्वत: शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन, ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल.
जय हिंद !
जय महाराष्ट्र !!
जय उल्लास !!!









