भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मराठी भाषण bharatratna do babasaheb ambedkar jayanti
” हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता; अन्याया विरुध्द लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा रामजी बाबांचा लेक- भीमराव आंबेडकर लाखात नाही, तर या जगात एक होते !”
मित्रानो, लहानपणापासूनच बाबासाहेब कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो”, असे ते नेहमी म्हणायचे.
इंग्रजी राजवटीचा तो काळ ! त्याकाळी भारतीय जनता गुलामगिरीच्या बेडीत, धार्मिक कर्मकांडात, अंधश्रद्धेत अडकली होती.
स्पृश्य लोक- अस्पृश्य लोक, उच्च-नीच असा भेदभाव केला जात होता. आणि याचे चटके आंबेडकरांना देखील भोगावे लागले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करण्याचे ठरवले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज बांधवांना अनमोल सदेश दिला,” शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा”.
दीनदलित, सर्वसामान्य, स्त्रिया गोरगरिबांचे अंधारलेले जीवन प्रकाशमय करण्याचे कार्य या ज्ञानसूर्याने केले. शेवटी मी एवढेच म्हणेन की..
“तिमिर दूर करण्या दीप एक उजळला, जो भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार ठरला.
शब्दही अपुरे पडती तुमचे गुण गाया, शतशत नमन करतो तुम्हाला भिमराया !”









