शब्दसमूहाबद्दल एक शब्द marathi grammar pdf
अनुज – सर्वांत शेवटी जन्मलेला
अवीट – ज्याला कधीही वीट नाही असे
अप्सरा – देवलोकातील सुंदर स्त्रिया
अभाव – एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती.
अतिथी – घरी पाहुणा म्हणून आलेला
आशीर्वाद – थोरांनी लहानांच्या प्रति व्यक्त केलेली सदिच्छा
अनावर – आवरता येणार नाही असे
अष्टपैलू – विविध बाबींत प्रवीण असलेला
अविनाशी – कधीही नाश न पावणारा
अथांग – ज्याचा थांग लागत नाही असा
अनुपम – ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे.
अपरिहार्य – न टाळता येणारे
अवर्णनीय – वर्णन करता येणार नाही असे
अविनाशी – कधीही नाश न पावणारे
अविस्मरणीय – ज्याचा विसर पडणार नाही असा
अननुभवी – अनुभव नसलेला
अंगाईगीत – लहान मुलाला झोपवण्यासाठी गायिलेले गाणे.
अविवाहित – ज्याचा विवाह झाला नाही असा
अल्पसंतुष्ट – थोडक्यात समाधान मानणारा
अर्धचंद्र देणे – हकालपट्टी करणे
अप्पलपोटा – स्वतःच्या फायद्याचे पाहणारा
अष्टावधानी – अनेक बाबींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा
अजातशत्रू – ज्यास कोणीही शत्रू नाही असा
अल्पायू – कमी आयुष्य असलेला
अजिंक्य – ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा
अत्युच्च – अतिशय उंच असणारा
अनाथाश्रम – निराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था
अन्योक्ती – एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलपणे
अल्पसंतुष्टी – थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती
अनवाणी – पायात पादत्राणे न घालता
अभूतपूर्व – पूर्वी कधीही न घडलेले
अनमोल – ज्याची किंमत होऊ शकत नाही असे
अनुतपूर्व – पूर्वी कधीही न ऐकलेले
अनाथ – कोणाचाही आधार नाही असा
अपक्ष – कोणाच्याही पक्षात सामील न होणारा
अमर – ज्याला कधीही मृत्यू नाही असा
अनुयायी – नेत्याचे अनुकरण करणारे
अन्नदाता – अन्न देणारा
अनावरण – पडदा दूर करणे
अतुलनीय – तुलना करता येणार नाही असे
अनाकलनीय – न कळण्यासारखे
असीम – ज्याला सीमा नाही असा
अंकुश – हत्तीला वश करण्याचे साधन
अप्रस्तुत – विषयाला सोडून बोलणे
अजर – ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा
अन्नछत्र – मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण
अबदरखाना – स्वच्छ, गार पाणी ठेवण्याची जागा
आपादमस्तक – संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत
आहेर – लग्नात द्यावयाची भेट
आदिवासी – अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी
आल्हाददायक – मनाला आल्हाद देणारा
आत्मवृत्त – स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र
आकाशगंगा – आकाशातील ताऱ्यांचा पट्टा
आस्तिक – देव आहे असे मानणारा
आबालवृद्ध – बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण
आसेतुहिमाचल – हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत
आंतरराष्ट्रीय – राष्ट्राराष्ट्रांमधील
आगंतुक – सूचना न देता येणारा, अतिथी
आजन्म – जिवंत असेपर्यंत
आजानुबाहू – ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा
आमरण – मरण येईपर्यंत
आभास – नसलेली गोष्ट आहे असे वाटणे
आश्रित – इतरांच्या आधारावर जगणारा
उर्वरित – शिल्लक राहिलेले
उद्यमशील – सतत उद्योगशील असणारा
उपकृत – ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा
उःशाप – शापापासून सुटका
उत्तरायण – सूर्याचे उत्तरेकडे सरकणे,
उदयोन्मुख – उदयाला येत असलेला
उधळ्या – सतत पैसा खर्च करणारा
उभयचर – जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा
उपऱ्या- घरदार नसलेला
उपळी – जमिनीतून पाझरून निघणारा झरा
उत्क्रांती – हळूहळू घडून येणारा बदल
एकलकोंडा – सतत एकटे राहण्याची आवड असलेला.
ऐतोबा – श्रम न करता खाणारा
एकेश्वरी – एकाच अवतारावर विश्वास ठेवणारे
कनवाळू – दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा
कमलाक्षी – जिचे डोळे कमलपुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी
कवयित्री – कवितेची रचना करणारी
कर्णमधुर – ऐकण्यास गोड लागणारे
कृष्णपक्ष – अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा / वद्यपक्ष
कल्पवृक्ष – इच्छिलेली वस्तू देणारे झाड
कर्तव्यपराङ्मुख – कर्तव्याकडे पाठ फिरविणारा
कथेकरी कथा सांगणारा
कलावान – एखादी कला अंगी असणारा
कपोतवृत्ती – कबुतराप्रमाणे अन्न संचयकरून अल्प काळात त्याचा उपयोग करणे. ि
कळवळणे – असहायपणे विनंती करणे.
कृतज्ञ – केलेले उपकार जाणणारा
कृतघ्न – केलेले उपकार न जाणणारा
कष्टकरी – कष्ट करून जगणारे
कर्तव्यतत्पर – आपले कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा
कामधेनू – इच्छिलेली वस्तू देणारी गाय
कामचुकार – कामाची टाळाटाळ करणारा
कार्यक्षम – कार्य करण्यास सक्षम असलेला
कुंजविहारी – कुंजात विहार करणारा
काठवत – भाकरी करण्याची लाकडी परात
क्रांती – अकस्मात घडून आलेला बदल
कुंभार – मडकी बनविणारा
खग – आकाशात गमन करणारा
खट्याळ – नेहमी खोडी काढणारा
खर्चीक – सतत पैसे खर्च करणारा
खेळगडी – आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा
गडकरी – गडाचा किंवा किल्ल्याचा प्रमुख अधिकारी
गजगामिनी – आहे अशी जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार
गर्भश्रीमंत – जन्मतःच श्रीमंत असलेली
गावकूस – गावाभोवतालचा तट
गाभारा – मूर्ती जेथे असते तो देवालयातील भाग
गावगाडा – गावाचा कारभार
गारुडी – सापांचा खेळ करणारा
गुणग्राहक – गुणांची कदर करणारा
गुप्तहेर – गुप्त बातम्या काढणारा
गिरिजन – डोंगरात वास्तव्य करणारे लोक
घाला – अचानक आलेले संकट
घोष – नावाचा एकसारखा उच्चार
घरभेदी – शत्रूला सामील झालेला
घोकंपट्टी – मोठ्याने केलेले पाठांतर
चतुष्पाद – चार पाय असणारे
चाकोरी – गाडीच्या चाकांनी पडलेली वाट
चक्रपाणि – ज्याच्या हाती चक्र आहे असा (विष्णू)
चित्रगुप्त – मानवाच्या पापपुण्याचा हिशोब ठेवणारा यमाचा सेवक
चक्रव्यूह – सैन्याची चक्राकार केलेली रचना
चिरंजीवी – चिरकाल जगणारा
चहाडखोर – चहाड्या सांगणारा
चंद्रमुखी – चंद्राप्रमाणे मुख असणारी
चावडी – गावच्या कामकाजाची जागा
चतुर्वेदी – चार वेदांमध्ये पारंगत असणारा
चांदणे – चंद्रापासून येणारा प्रकाश
चव्हाटा – चार रस्ते एकत्र येतात ती जागा.
जन्मभूमी – जेथे जन्म झाला ती भूमी
जगज्जेता – जग जिंकणारा
जहाल – रागीट / त्वरित कृती करणारा
जलचर – पाण्यात राहणारे
जर्जर – कमकुवत झालेला
जयघोष – नावाचा एकसारखा उच्चार
जिवलग – जिवाला जीव देणारा
जिज्ञासू – जाणून घेण्याची इच्छा असणारा
जगन्नियंता – जगाचे नियंत्रण करणारा
झड – सतत कोसळणारा पाऊस
टंकसाळ- नाणी तयार करण्याचा कारखाना
टवाळखोर – रिकामा हिंडणारा
तहनामा – तहांच्या अटींचा तर्जुमा
तगाई – शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज.
तट – किल्ल्याच्या भोवतालची संरक्षक भिंत
तिठा – तीन रस्ते एकवटतात ती जागा
तितीक्षा – हालअपेष्टा सहन करण्याचा गुण
तोंडपुजेपणा – तोंडावर स्तुती करण्याचा गुण
ताम्रपट – तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख
तोळा मासा – अतिशय नाजूक
दंतकथा – तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट
दीपस्तंभ – जहाजांना दिशा दाखविणारा मनोऱ्यावरील दिवा
द्वीपकल्प – तीन बाजूंनी पाणी असलेला प्रदेश
दिवाभीत – दिवसाला भिणारे
दैववादी – नशिबावर विश्वास ठेवून वागणारा
द्विज – दोन वेळा जन्मलेला ब्राह्मण, दात व पक्षी यांना द्विज म्हणतात.
दरवेशी – अस्वलाचा खेळ करणारा
दुथडी – दोन्ही थड्या भरून वाहणारी नदी
दानशूर – खूप दान-धर्म करणारा
दैनिक – दररोज प्रसिद्ध होणारे
द्रष्टा – साक्षात्कार झालेला.
दुआब – दोन नद्यांमधील जागा
दीर्घायू – भरपूर आयुष्य असणारा
दुराग्रही – चुकीच्या बाबीसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा
दीर – पतीचा भाऊ
देशान्तर – एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणे
दिवटी – कापड बांधून मशाला तयार केलेला दिवा.
दिगंतर – सर्व दिशांना पांगलेले
दरिद्री नारायण – अतिशय गरीब व्यक्ती
धर्मशाळा – यात्रेकरूंच्या निवासासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत
धर्मान्तर – एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे.
धबधबा उंचावरून कोसळणारा पाणलोट
ध्येय – जे साध्य करावयाचे आहे ते
धनवान – भरपूर संपत्ती असणारा
धर्मांध – केवळ धर्मभेद करणारा
धारवाडी काटा – बिनचूक वजनाचा काटा
न्यायनिष्ठूर – न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा.
निर्वासित – घरादारास व देशास पारखा झालेला
नखशिखान्त – पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत
निपुत्रिक – अपत्य नसणारा
निशाचर – रात्री फिरणारा
नवज्वर – नऊ दिवस टिकणारा ताप
नादिष्ट – एकाच गोष्टीचा नाद करणारा
नवमतवादी – नवीन मतांचा पुरस्कार करणारा
निष्पक्षपाती – कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा
नियतकालिक – ठरावीक काळानंतर प्रसिद्ध होणारे
निरपेक्ष – कसलीही अपेक्षा नसणारा
निर्भय कशाचीही भीती नसणारा
निष्कलंक – चारित्र्यावर कसलाही डाग नसणारा
नट – नाटकात भूमिका करणारा पुरुष
निराधार – कुणाचाही आधार नसणारा
निराकार ज्याला आकार नाही असा
नभचर – आकाशात वावरणारे
नंदादीप – देवापुढे सतत जळणारा दिवा
निरक्षर – लिहिता-वाचता न येणारा
नांदी नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत
नौकाविहार – नावेतून करावयाची क्रीडा
परोपजीवी – दुसऱ्याच्या जिवावर जगणारा
परस्परावलंबी – एकमेकांवर अवलंबून असणारे
परावलंबी – दुसऱ्यावर अवलंबून असणारा
पक्ष (पंधरवडा) – पंधरा दिवसांचा काळ
पंच – तंटा सोडविण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक
पंचांग – तिथी, वार, नक्षत्र, योग व करण वगैरे दिनवैशिष्ट्यांची माहिती असलेली पुस्तिका
प्रलयकाळ – जगाचा नाश होण्याची वेळ
पाणपोई – फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय
पाऊलवाट – फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरुंद वाट
पागा – किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा
परिचारिका – आजारी लोकांची शुश्रूषा करणारी
पाक्षिक – पंधरा दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक
पारदर्शक – ज्यातून आरपार दिसू शकते अशी वस्तू
पाश्चिमात्य – युरोप, अमेरिका या पश्चिमेकडील देशांतील लोक
पाणंदी – समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील वाट
पाणबुडी – पाण्याखालून चालणारी बोट
पाणवठा – गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा
पुढारी – लोकांचे पुढारीपण करणारा
पांजरपोळ – म्हाताऱ्या व लंगड्यालुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण
पुराणमतवादी – जुन्या मतांना चिकटून राहणारा
पुरोगामी – आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा
पोरका – आईवडील नसलेला
पेय – पिण्यास योग्य असलेला द्रवपदार्थ
पूरग्रस्त – पुरांमुळे नुकसान झालेले लोक
परदेशगमन – दुसऱ्या देशात जाणे
परिसर – भोवतालचा प्रदेश
पंचवटी – पाच वडांचा समुदाय असलेली जागा
पंचक्रोशी – विशिष्ट स्थळापासून पाच कोसांचा प्रदेश
पंकज – चिखलात उगवलेले कमळ
पूर्वज – पूर्वी जन्मलेला
पोपटपंची – अर्थ न समजता केलेले पाठांतर
पोरकट – पोरबुद्धीने वागणारा
प्रदर्शन – पाहण्यायोग्य अनेक वस्तू मांडलेली जागा
प्रजासत्ताक – लोकांच्या मदतीने चाललेले राज्य
प्रेक्षक – पाहण्यास जमलेले लोक
पुनर्वसन – विस्थापितांना पुन्हा वसविणे
प्रक्षिप्त – ग्रंथात मागाहून घातलेला मजकूर
पाथगी – पिकांच्या दोन ओळींतील अंतर
पाथरवट – इमारतीचा दगड घडविणारा
पूर्वपक्ष – वादविवादात प्रथम मांडलेली भूमिका
फितूर – शत्रूला सामील झालेला
बखळ पडक्या घराची मोकळी जागा
बेट – चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश
बहुश्रुत – ज्याला खूप माहिती आहे असा
बारभाई- बारा जणांचा कारभार
बोगदा – डोंगर पोखरून आरपार तयार केलेला रस्ता
बिनबोभाट – कोणालाही कळू न देता
बुद्धिजीवी – ज्यांना प्रामुख्याने बुद्धीचा वापर करावा लागतो असे लोक
बेवारसी – वारस नसलेला
बुद्धिप्रामाण्यवादी – बुद्धी प्रमाण मानून त्याप्रमाणे वागणारा
बिनतक्रार / विनातक्रार कोणतीही तक्रार न करता
बाजारबुणगे – फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे.
बातमीदार वर्तमानपत्रात बातमी देणारा
बहुरूपी – विविध सोंगे घेणारा
भाकडकथा निरर्थक गोष्टी किंवा गप्पा
भाट – राजाची स्तुती करणारा
भांडकुदळ – भांडण उकरून काढणारा
भूचर – जमिनीवर राहणारा
मचाण माचा, शिकार किंवा निरीक्षण करण्यासाठी रानात बांधलेला उंच माळा
महत्त्वाकांक्षी – विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा
मदारी – माकडांचा खेळ करणारा
माचा पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव
मनकवडा – दुसऱ्याच्या मनातील जाणणारा
म्हातारचळ – म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार
मासिक – दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक
माहेर – लग्न झालेल्या मुलीच्या आई-वडिलांचे घर
मिताहारी – मोजकाच आहार घेणारा
मितव्ययी – काटकसरीने खर्च करणारा
मीनाक्षी – माशासारखे डोळे असणारी स्त्री
मुद्देसूद – मुद्याला धरून असलेले
मूर्तिपूजक – मूर्तीची पूजा करणारा
मृगनयना – हरिणीसारखे डोळे असणारी स्त्री
मृत्युंजय – मृत्यूवर विजय मिळविणारा
मिश्रविवाह – भिन्न जातींतील वधू-वरांचे लग्न
मनसोक्त – मन मानेल तितके
मनमिळाऊ – सर्वांशी मिळून मिसळून वागणारा
मर्त्य – जे केव्हा ना केव्हा तरी मृत्यू पावणार असतात असे
मदिराक्षी – जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद करणारे आहेत अशी
मनमौजी – स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे
मशालजी – मशाल धरणारा नोकर
मारेकरी – दुसऱ्याला ठार मारण्याकरिता पाठवलेला माणूस
मार्गदर्शक – इतरांना मार्ग दाखविणारा
माथाडी – डोक्यावरून ओझे वाहून नेणारा
माजघर – घरातील मधले दालन
मूर्तिभंजक – मूर्तीचा नाश करणारा
मूर्खशिरोमणी – अतिशय मूर्खपणा करणारा – मूर्खातील मूर्ख
मिंधा – उपकाराखाली ओशाळा बनलेला
मेघाच्छादित – ढगांनी आच्छादलेला
मीठ-भाकरी – साधे जेवण
युगपुरुष – समाजातील परिस्थितीला बदलून, तिला योग्य वळण लावणारा
यथाशक्ती – शक्य असेल त्याप्रमाणे
यादवी – आपापसातील कलह
युयुत्सु – लढण्याची इच्छा असणारा
यज्ञसूकर – वराह अवतार
रणवीर / रणशूर – युद्धात शौर्य दाखवणारा
राजनर्तिका – राजाच्या दरबारात नृत्याचे काम करणारी स्त्री
रामप्रहर / पहाट – सूर्योदयापूर्वीचा काळ
लोकप्रिय – लोकांना आवडणारे
लेखनशैली – लिहिण्याची हातोटी
लोकशाही – लोकांच्या हितासाठी असलेली राज्यपद्धती
लोकोत्तर – सामान्य लोकांत अपवादाने आढळणारा सज्जन
लेणे – डोंगरात कोरलेले मंदिर
लोहार – लोखंडाच्या वस्तू बनविणारा
लोकसभाध्यक्ष – केंद्रीय कायदेमंडळातील सभाध्यक्षांचे पदनाम
वक्ता – सभेत भाषण करणारा
वडिलोपार्जित – वाडवडिलांपासून मिळालेले
वक्तृत्वकला – भाषण करण्याची कला
वर्णनशैली – वर्णन करण्याची हातोटी
वरबाप – नवऱ्या मुलाचा बाप
वरमाय – नवऱ्या मुलाची आई
वाटाड्या वाट दाखवणारा
विघ्नहर्ता संकटांचे निवारण करणारा
विडंबन – दोषांवर विनोदी पद्धतीने केलेली टीका
विलापिका – शोकाचे वर्णन करणारी कविता
वार्षिक – वर्षाने प्रसिद्ध होणारे
वामकुक्षी – दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा
विनावेतन – पगार न घेता काम करणे
विधुर – ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष
विधवा – जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री
वैष्णव – भगवान विष्णूची उपासना करणारा
वनवासी – वनात राहणारे लोक
वल्कले – झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्र
वात्सल्य – आईला मुलाविषयी वाटणारे प्रेम
व्यभिचारिणी – व्यभिचारी स्त्री
वाचनालय – सर्वांसाठी एकत्र वाचनाची सोय
विकीपीडिया – संगणकीय महाजाल जगतातील ज्ञानकोश
वेशांतर – वेश बदलणेता
व्यवहारशून्य – व्यवहाराचे ज्ञान नसलेला
व्याख्याता – व्याख्यान देणारा
विकल्प – शंका, संभ्रम, पर्याय
वैधानिक – कायद्याने प्रस्थापित होणारे
वखार – धान्य साठविण्याची बंदिस्त जागा
वाटाघाटी – मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी
वचनबद्धता – एखाद्याला दिलेल्या वचनाशी बांधिलकी
व्यवहारज्ञानी – व्यवहारात चतुर
वानरकिवण – अपायकारक सहानुभूती
वेस – गावाचे प्रवेशद्वार
शतपावली – जेवण झाल्यानंतर थोडेसे अंतर फिरण्याचा परिपाठ
शरणागत – शरण आलेला
शाश्वत – कधीही नष्ट न होणारे
शाप – एखाद्याचे वाईट होवो अशी इच्छा
शतायुषी – शंभर वर्षे आयुष्य असणारा
शिल्प – दगडावर केलेले कोरीव काम
शिलालेख – दगडावर कोरलेले लेख
शुक्लपक्ष – चांदणे असलेला पंधरवडा
शेजारधर्म – शेजाऱ्यांशी वागण्याबाबातचे कर्तव्य
शैव – भगवान शंकराची उपासना करणारा
शीघ्रकोपी – अतिशय लवकर रागावणारा
शिक्केनवीस – राजाचा शिक्का सांभाळणारा
शाखाचक्रमण उडत उडत केलेले वाचन
शुभ – पवित्र – शिव – मंगळ
श्रद्धाळू – श्रद्धा ठेवून वागणारा
श्रमजीवी – श्रम करून जीवन जगणारे
श्रोता – दुसऱ्याचे भाषण ऐकणारे
सत्याग्रह – अन्यायनिवारणार्थ सत्याचा आग्रह धरणे
सूत्र – मोजक्या शब्दांत सांगितलेले तत्त्व
सत्याग्रही – सत्यासाठी झगडणारे
सभाधीट – सभेत धीटपणे भाषण करणारा
सनातनी – जुन्या रूढीपरंपरेनुसार वागणारा
समकालीन – एकाच काळातील
संगम – दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण
संस्थापक – एखाद्या संस्थेची स्थापना करणारा
सुवासिनी – जिचा पती जिवंत आहे अशी
स्मारक – मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून बांधलेली वास्तू
स्वकष्टार्जित – स्वतः श्रम करून मिळविलेले
स्वगत – स्वतःशी केलेले भाषण
स्वच्छंदी – स्वतःच्या इच्छेने वागणारा
स्वदेशी – आपल्याच देशात तयार होणारे
स्वयंसेवक – आपल्या इच्छेने सेवाभावाने समाजकार्य करणारा
स्वार्थत्यागी – स्वतःच्या हिताचा त्याग करणारा
स्वार्थपरायण – स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा
स्वाभिमानशून्य – स्वतःचा मुळीच अभिमान नसणारा
स्वाभिमानी – स्वतःचा अभिमान असणारा
स्वामिनिष्ठ – धन्याशी निष्ठेने वागणारा
स्वावलंबी – स्वतःचे काम स्वतःच करणारा
साप्ताहिक – आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक
साम्यवादी – सर्व समाजात समता नांदावी असे म्हणणारा
साक्षर – लिहिणे, वाचणे येत असलेला
सुभाषित – बोधपर वचन
सुविचार – चांगला विचार
सुसाध्य – सहज साध्य होऊ शकणारे
सुस्कारा – दुःखाच्या भावनेतून सोडलेला लांब श्वास
सदावर्त – मोफत शिधा मिळण्याचे ठिकाण
स्थितप्रज्ञ – कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते, तो
समाजसेवक – समाजाची सेवा करणारा
सांगोपांग यथासांग
सहोदर – एकाच आईच्या पोटी जन्मलेले.
सोयरीक – विवाहबंधनामुळे दोन कुटुंबांत निर्माण झालेले नातेसंबंध.
सहगमन – पती निधनानंतर पत्नीने पतीबरोबर केलेले आत्मदहन
संगनमत – अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट
सांगकाम्या – सांगितलेले तेवढेच करणारा
सामंतशाही – सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन
हृदयद्रावक – अंतःकरणाला पाझर फोडणारे
हुतात्मा – देशासाठी / समाजासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा
हेर – शत्रूकडील बातमी काढून आणणारा
हृदयस्पर्शी – हृदयाला जाऊन भिडणारे
होयबा – सर्व गोष्टींना होकार देणारा
हतभागी – ज्याचे/जिचे भाग्य नाहीसे झाले आहे असा/अशी
क्षणभंगुर – क्षणात नष्ट होणारे
क्षितिज – जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण
त्रिशंकू – धड ना इकडे, धड ना तिकडे
त्रैमासिक – तीन महिन्यांतून प्रसिद्ध होणारे नियतकालिक
त्राटिका – अतिशय भांडखोर स्त्री
अप्रस्तुत – विषय सोडून
यादवी – आपापसातील कलह
पोरका – आईवडिलांना पारखा झालेला.
अनाथ – घरादाराला पारखा झालेला
आकरावा बृहस्पती – दाट मैत्री.
आंबट तोंड – निराशेची, मुद्रा
आंबट शौकीन भलत्याच चैनी करणारा
हृनमीन सवातीन अगदी कमी प्रमाणात
कातर वेळ संध्याकाळ
काळा फत्तर अगदी मूर्ख
घाशीरामी – जुलमी, मूर्खपणाची, कारकीर्द
दरिद्रनाम संवत्सरे अत्यंत दरिद्री
दिवटा – बेअकली माणूस
पांढरी पोळी साधी पोळी
पाताळयंत्री – गुप्त मसलती करणारा
पायलीचे पंधरा – अतिविपुल
बालबोध – मुलांना समजण्यासारखे, सोपे
शंभर नंबरी – अत्यंत शुद्ध
शेणामेणाचा अशक्त
ओवाळून टाकणे – तुच्छ, कुचकिमतीचा म्हणून फेकूण देणे.
अलबत्या गलबत्या क्षुल्लक माणूस, बिनकामाचा माणूस
अस्मानी सुलतानी – दुर्दैवामुळे किंवा राजाच्या दुष्टपणामुळे प्राप्त झालेली संकटे.
आकाशपाणी – मद्य
आंतबट्ट्याचा व्यापार – नुकसानकारक व्यापार
आखाडसासरा – नसता मोठेपणा आपणाकडे घेऊन दुसऱ्यावर करडा अमल चालवू पाहणारा माणूस
कोटकल्याण – फार मोठे कल्याण
ऋणानुबंध – पूर्वजन्मांचा संबंध, स्नेह, घरोब्याचा संबंध
उंटाचे पिलु – प्रथम प्रिय वाटणारी आणि नंतर त्रासदायक होणारी वस्तू
कुंभारणीचे घर – जेथे गेल्याने बुद्धीभ्रंश होतो, रूप पालटते
गजान्त लक्ष्मी अतिशय श्रीमंती.
गजान्त लक्ष्मी अतिशय श्रीमंती.
गुलाबाचे फूल – नाजूक पुरुष किंवा स्त्री, मूल
गोरज मुहूर्त – संध्याकाळची वेळ
घटोत्कचाचा बाजार – फसवेगिरी
घड्याळ टिपरू खायाला भाकर आणि तोंडी लावायाला मिरची असे अगदी साधे, गरीबाचे जेवण
घोड नवरा – मोठ्या वयाचा वर
चंदुलाल – चैनी, उधळ्या, माणूस
चौकोनी चिरा – हव्या त्या कामाला उपयोगी पडणारा माणूस
जगतशेट – अति श्रीमंत माणूस
जावई शोध – भलतीच सुधारणा, जो बदल केल्याने वस्तू पहिल्यापेक्षा अधिक वाईट होते असा बदल
झोटिंगबादशाही – अव्यवस्था
त्रिशंकु – धड इकडे ना तिकडे, अधांतरी
नंदी बैल – मूर्ख, अविद्वान, बेअकली माणूस
परसातली भाजी – विनासायास मिळणारी वस्तू
नृसिंहावतार – उग्र स्वरूप
माकडाची जखम – ज्यांत अनेक लोक पडल्यामुळे विचका झाला आहे असे काम
मधुमक्षीकेचे व्रत उपयुक्त आहे असे घेण्याची वृत्ती
मुक्ताफळे – मुर्खासारखे बोललेले शब्द
रामराज्य – अत्यंत सुखाचे राज्य
मिना बाजार – ज्या बाजारात दुकाने चालविणाऱ्या बायकाच असतात आणि खरेदी करणाऱ्याही बायकाच असतात
लंबकर्णाची स्वारी – गाढव
स
र
वितंडवाद – मूर्खपणाचा वाद-विवाद
वाघाची मावशी – मांजर
शिंखडी – हा प्रथम स्त्री असून नंतर त्यास पुरुषत्व प्राप्त झाले अशी पौराणिक कथा आहे.
वेडा पीर – छांदिष्ट माणूस, अचरट माणूस
शेंदाडशिपाई – भित्रा माणूस
सूर्याचे पिल्लू – दिवा
सुदाम्याचा अवतार – अतिशय हाडका आणि रोडका माणूस
हिंगाचा खडा – तल्लख माणूस
वृत्तनिवेदक – बातम्या सांगणारा
ढालगज भवानी – शूर, उपद्व्यापी स्त्री (जहांबाज)
चीज – राग गायनासाठी रचलेले काव्य
लवाद – उभय पक्षांच्या संमतीने नेमलेला मध्यस्थ
धारेकरी – धाऱ्याने जमीन घेणारा
मंग्यारो – गवत, पतेरा गोळा करण्याचे साधन
यमनियम – आत्मसंयमनासाठी करावयाची कृत्ये
शिरपेच – पागोट्यात खोवण्याचा जडावाचा मोत्याचा तुरा
शेमला – डोक्याला बांधलेल्या पटक्याचा पदर
धूळभेट – उभ्याउभ्या झालेली भेट
अनभिज्ञ – काहीच माहिती नसलेला
शकुनीमामा – कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य
सद्सद्विवेक बुद्धी – सत्य, असत्य व बुद्धीला स्मरुन
गडंगनेर – लग्नापूर्वी नवरदेव नवरीला दिलेली मेजवाणी
त्रिदण्डी – शरीर, मन, वाचा यांच्यावर नियंत्रण ठेवणे
पराधीन – दुसऱ्याच्या अधीन असणारा
पाणिवळ – पाण्यावरील पालापाचोळा, कचरा
गणगवळण – तमाशाच्या प्रारंभीचे स्तवन
मेहूण – धार्मिक कार्यासाठी लग्न झालेल्या जोड्यांना बोलाविल्यास त्याला मेहूण म्हणतात.
बजबजपुरी – गोंधळाची स्थिती
नगद नारायण – अत्यंत गरीब व्यक्ती
भद्रेश्वर दीक्षिती – मध्यस्थी करणे
विश्वामित्र – अहंमन्य मनुष्य
बोंबल्या गणेश – नेहमी अमंगळ बोलणारा
बिवलकरी कित्ता – अक्षराचे नमुनेदार वळण
पिंपळावरचा मुंजा – कायम भटका माणुस
मांदीयाळी – विपुलता
पिंडीवरचा विंचु- थोरांच्या आश्रयास असलेली दुष्ट व्यक्ती
पाप्याचे पितर – रोडका, दुबळा मनुष्य
पढतमूर्ख – शिकलेली पण मूर्ख व्यक्ती
नरसिंह – उग्र व पराक्रमी व्यक्ती
धन्वंतरी – कुशल वैद्य
मल्लिनाथी – एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका
हस्तलाघव – हस्तकौशल्य
शाडू – एक प्रकारची माती









