ध्वन्यार्थ एका शब्दाचे अनेक अर्थ marathi grammar
अंग
शरीर, भाग, बाजू, अवयव
अक्षर
पूर्ण उच्चाराचा वर्ण, शाश्वत
अभंग
मराठी काव्यरचनेचा एक प्रकार, न भंगलेले,
अंबर
आकाश, वस्त्र
अनंत
अमर्याद, विष्णू
अर्थ
पैसा, आशय
अंक
आकडा, मासिकाचा अंक, मांडी, नाटकाचा अंक
ओढा
पाण्याचा प्रवाह, आकर्षण
उत्तर
प्रश्नाचे उत्तर, उत्तर दिशा, नंतरचा, उत्तरपद
कळ
गुप्त किल्ली, वेदना, भांडणाचे कारण
कर्ण
कान, कुंतीपुत्र
काम
कृत्य, इच्छा, मदन देव
कसर
उणीव, बारीक ताप
कर
हात, किरण, जकात
शुद्ध
पवित्र, निर्मळ, स्पष्ट जाणीव
काळ
वेळ, मृत्यू
कोट
अंगात घालण्याचे एक कापड, संख्या, किल्ला
वात
दिव्याची वात, वारा, एक विकार
वार
दिवस, घाव
वजन
तराजूत घालण्याचे वजन, प्रतिष्ठा
वाढ
वाढ होणे, जेवायला वाढणे
वर
श्रेष्ठ, पती, आशीर्वाद, दिशा
वर्ण
रंग, जात, मुखावटे निघणारे भाषेचे मूलध्वनी
वाणी
व्यापारी, एक जात, बोलणे
वंश
बांबू, कुल, संतती
वास
नाकाला येणारा वास, वस्ती, राहणे
व्यसन
संकट, वाईट नाद
विषय
शिकण्याचा एखादा विषय, पैसा, प्रदेश
कोळी
मासे पकडणारा, एक कीटक
वाणी
बोलणे, व्यापारी
खोड
झाडाचे खोड, वाईट सवय, व्यंग
गंध
कपाळाला लावण्याचा गंध, सुवास
गदा
एक आयुध, संकट
गोम
अनेक पायांचा एक किडा, खोड, खुबी
नग
पर्वत, वस्तू/जिन्नस
नाद
छंद, ध्वनी, आवड
नाग
सर्प, हत्ती
माळ
फुलांची माळ, ओसाड जागा
माया
प्रेम, धन
भेट
भेटी-गाठीतील भेट, नजराणा
खडा
लहानसा दगड, उभा
घन
दाट, गाढ, मेघ, संख्येचा घन, अद्रव
घाट
डोंगरातील रस्ता, आकार, नदीच्या पायऱ्या
पूर
पाण्याचा पूर, नगर
चपला
पायात घालण्याची वहाण, वीज
पार
मर्यादा, वडाचा पार, पलीकडे
चाल
पाट
गती, हल्ला, पद्धती
जागा
बसायचा पाट, पाण्याचा पाट
पट
ठिकाण, जागृत
शाळेतील मुलांची एकूण संख्या, सोंगट्याचे साधन, वस्त्र, नियमांचा तक्ता
डाव
खेळाचा डाव, कारस्थान
पर
पीस, परका, परंतु, श्रेष्ठ
तीर
बाण, काठ
पत्र
चिठ्ठी, लेखी मजकूर
दंड
काठी, बाहू, शिक्षा, व्यामाचा एक प्रकार
धर्म
स्वभाव, नीती, पांडवांचा मोठा भाऊ
घड
मानेखालचा शरीराचा भाग, व्यवस्थितपणा, नीट
नाव
व्यक्ती/ वस्तूचे नाव, होडी, कीर्ती
द्विज
पक्षी, ब्राह्मण, दात (दोनदा जन्म घेणारा)
पय
दूध, पाणी
पद
पाय, गीत, स्थान
राग
क्रोध, रंग, प्रेम, संगीतातील विशिष्ट सुरावट
दल
सैन्य, पाकळी
पण
प्रतिज्ञा, सुद्धा, परंतु
तट
किनारा, किल्ल्याची भिंत, कडा
पक्ष
पंधरवडा, पंख, बाजू, गट
जीवन
आयुष्य, पाणी
पाव
चौथा हिस्सा, पाय, खाण्याचा पदार्थ
जलद
वेगाने, मेघ
पात्र
योग्य, भांडे, नदीचे पात्र, नाटकातील भूमिका, बावळट व्यक्ती
चिरंजीव
मुलगा, कायम टिकणारा
भाव
चरण
किंमत, भक्ती, दर, आशय
पाय, कवितेची ओळ
मान
मोठेपणा, शरीराचा एक भाग, सत्कार, गळा, आदर
मात्रा
उपाय, बाराखडीतील चिन्ह, औषधी गोळी
गुण
सद्वर्तन, अंक, दोरी, मूळ स्वभाव
मित्र
दोस्त, सूर्य
गंज
गवताची रास, लोखंडाचा गंज, एक उभट भांडे
गज
हत्ती, खिडकीची सळई
खल
दुष्ट, कुटण्याचे साधन, गुप्तचर्चा
खत
पत्र, दस्ताऐवज, वनस्पतीच्या वाढीसाठी लागणार पदार्थ
विभूती
थोर पुरुष, भस्म, अंगारा, श्रेष्ठ
कोरडा
सुका, निरर्थक
शिळा शिळा पदार्थ, मोठा दगड
कासार
बांगड्या भरणारा, तलाव
शृंग
शिंग, डोके, शिखर
काच
पारदर्शक पदार्थ
सुमन
फूल, चांगले मन
सूत
धागा, दोरा, संधान, सारथी
बैठक
बसून गाणे, चर्चेसाठी एकत्र बसणे
ऋणानुबंध
पूर्वजन्माशी संबंध, योगायोग, ईश्वरी सूत्र
सुधा
अमृत, चुना, मुलीचे नाव
बल
शक्ती, सैन्य
हार
गळ्यात घालण्याचा हार, पराभव









