संदर्भ
: १) केंद्रशासनाचे पत्र क्रमांक F. N०. १२-१/२०२५-१९-४, दि. २४/०९/२०२५
२) सचिव, भारत सरकार, युवा और खेल मंत्रालय यांचे पत्र क्रमांक Do.No. १-१३०११/८/२०२५/My Bharat, दि. १८/०९/२०२५
संदर्भिय पत्राचे अवलोकन व्हावे.
विकसित भारत यंग लीडरशीप (VBYLD)-२०२५ च्या यशानंतर, राष्ट्रीय युवा दिन, २०२६ च्या उत्सवाचा एक भाग म्हणून, यावर्षी विकसित भारत युवा नेते संवाद २०२६ मोठ्या प्रमाणात आयोजित केले जाईल, असे संदर्भिय पत्र क्र. २ अन्वये युवा व क्रीडा मंत्रालयाने केंद्रशासनास कळविले आहे. या कार्यक्रमाच्या मागील आवृत्तीत देशभरातील २८ लाखांहून अधिक तरुणांनी सहभाग घेतला होता, ज्यात माननीय पंतप्रधान आणि इतर मान्यवरांसमोर सुमारे २५०० तरुण नेत्यांनी सादरीकरणे केली होती. विकसित भारत यंग लीडरशीप (VBYLD) २०२६ मध्ये डिझाइन आणि तांत्रिक आव्हानांवर लक्ष केंद्रित करणारे नवीन वर्टिकल सादर केले जातील. VBYLD-२०२६ च्या पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून, विकसित भारत प्रश्नमंजूषा हा कार्यक्रम १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत My Bharat (https://mybharat.gov.in/quiz) या पोर्टलद्वारे देशभरात इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी
आयोजित केला जात आहे. या प्रश्नमंजूषाचा उद्देश राष्ट्राच्या विविध पैलूंवरील ज्ञानाची चाचणी घेणे, विकसित भारताचे स्वप्न प्रतिबिंबित करणे आहे.
या संदर्भात, आपल्या अधिनस्त सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विकसित भारत प्रश्नमंजुषा कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी प्रोत्सहित करणेबाबत व विकसित भारत प्रश्नमंजुषा या उपक्रमाची व्यापक प्रसिद्धी करणेबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेश देण्यात यावे.












