महाराष्ट्रातील विविध संस्थेच्या अद्यावत चेंज रिपोर्टबाबत change report
संदर्भ:- १. मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या दि. १८.११.२०२५ रोजीच्या सभेतील सूचना
२. संचालनालयाचे पत्र जा.क्र. शिसंमा/संस्था. चेंज/२०२५/एस-२/१५६११४०, दि. २५.११.२०२५
उक्त विषयाबाबत आपणांस कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्यामध्ये संस्था नॉदणी अधिनियम १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० नुसार नोंदणीकृत शैक्षणिक संस्था आहेत. सदर काही संस्थांच्या कार्यकारिणीमध्ये वाद आहेत. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी व न्यायालयीन प्रकरणे होत आहेत. तसेच संस्थेच्या कार्यकारिणीच्या वादामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे सकृतदर्शनी दिसून आलेले आहे. आपल्या विभागातील/जिल्ह्यातील कोणत्या शैक्षणिक संस्थांचा चालू कालावधीचा कार्यकारिणी बदल अहवाल (चेंज रिपोर्ट) मंजूर झालेला नाही, याची माहिती या कार्यालयास सादर करणेबाबत संचालनालयाचे संदर्भ क्र. २ अन्वये कळविण्यात आले होते.
तरी आपणांस पुनश्च कळविण्यात येते की, उक्त विषयाची माहिती बुधवार दि. १७.१२.२०२५ रोजी पर्यंत संचालनालयास सादर करावी सदर दिनांकापर्यंत माहिती सादर न केल्यास शुक्रवार दि. १९.१२.२०२५ रोजी समक्ष संचालनालयात उपस्थित राहून माहिती सादर करण्याची दक्षता घ्यावी.










