सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणारा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत (६ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणा-या आणि असुधारित वेतन संरचनेत (५ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणा-या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना मंजूर करण्यात येणा-या महागाई भत्त्याच्या दरात दि. १ जानेवारी, २०२६ पासून सुधारणा करण्याबाबत dearness allowance
संदर्भ-
१) वित्त विभाग क्र. मभवा-१३२६/प्र.क्र.१६/सेवा-९, दिनांक १८ ऑगस्ट, २०२६ चे तीन शासन निर्णय.
२) शासन पत्र क्र. संकीर्ण-२४१९/प्र.क्र.४२/अर्थसंकल्प, दिनांक १८/८/२०२६
३) मा. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/महागाई भत्ता/२६-२७/२०८९३९६ दि. १९/८/२०२६
उपरोक्त विषयी संदर्भिय पत्राचे कृपया अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न)
उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्र. १, २ व ३ अन्वये महागाई भत्त्याच्या दरात दि. १ जानेवारी, २०२६ पासून सुधारणा व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
२. त्याअनुषंगाने संदर्भिय शासन निर्णय, शासन पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी.








